Saturday, August 25, 2007

वडेवाले आणि मी

चवहीन, रसहीन, रंगहीन, रुपहीन, आकारहीन. अरबट, चरबट, तेलकट. हे वर्णन आहे, बटाटवडयाचे, भज्यांचे, मिसळचे.

पुणे-मुंबई महामार्गावर वाकडच्या पुढे, एक्स्प्रेस वे वर वळण्याआधी असलेल्या एका सुप्रसिद्ध वडेवाले यांच्याकडे मिळणाऱ्या पदार्थांचे. तीच गत मिसळची. त्या बरोबर मिळणाऱ्या पावाची. त्यात हे वडे परत तळले असावे, तेल निथळायला सुद्धा अवधी दिला गेला नव्हता असे जाणवले.
काही काही उपहारगृहे कशाच्या जोरावर चालतात हे सांगणे फार कठीण असते.

पोटातल्या भुकेने विवेकावर मात केली, मुंबईस परततांना आम्ही येथे थांबलो, परत थांबणार नाही. त्यात परत वैशालीत उदरभरण करण्याचा बेत आयत्या वेळी बदलुन हे असे दर्जाहीन पदार्थ खाल्याने चीडचीड आणखीन वाढली. खर म्हणजे रुप बघितल्या नंतर तेथुन काढता पाय घेयला हवा होता, पण मग बरोबरची माणसे काय म्हणतील या विचाराने वडे, मिसळ खाण्याचे ठरवले. किती अत्याचार केला मी त्या वेळी माझ्या पोटावर !

या एक्स्प्रेस वे वर व्यवस्थीत चांगले, स्वच्छ व वाजवी किंमतीत खाण्यासाठी योग्य ती सोय अजीबात नाही.

अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे.

लिहीणार - आपल्याला खाण्यातले थोडेफार कळते याचा भ्रमनिरास झालेला.

1 comment:

Jobove - Reus said...

very good blog congratulations
regard from Catalonia Spain
thank you