यु खुदा के लीये छीनो ना मेरे होशो हवास । ऐसे गाया ना करो की ख़ुमार आ जाये ॥ (मुळ - ऐसे नज़रोसे ना देखो की ख़ुमार आ जाये). आज दिवली अमावस्या ,गटारी. तुडुंब मदिरापान करुन गटारात लोळायचा दिवस. सकाळी सकाळी मला नशा चढली आहे. तरी पण मी हे पुर्ण शुद्धीत राहुन लिहीत आहे.
कारण ही नशा सुरेची नाही तर सुरांची आहे. तरुण पिढीतील अग्रणीय गायक श्री. राहुल देशपांडेचे गाणे ऐकुन आलेली ही झिंग आहे.
आज मुंबईत कर्नाटक संघात खयाल ट्र्स्ट नी पं.कॄष्णराव शंकर पंडीत यांच्या स्मॄती उत्सव निमीत्ते आयोजील्या शास्त्रीय संगीताच्या दोन दिवशीय महोत्सवात श्री. राहुल देशपांडे सर्व रसीकांना राग रामकली, नटभैरव, चीज सावरे आजय्यो, व निर्गुणी भजन गावुन तॄप्त करुन राहीले.
(Video upload pending )
लिहीणार - राहुलजींचा चाहता.
- ज्याला थोडे तरी गाणे कळायला हवे होते.
No comments:
Post a Comment