"मला यात आपले प्रतिबिंब दिसले". इती राजाभाऊंची बायको.
आज लग्नानंतर बहुदा पहिल्यांदाच आपल्याच विश्वातुन बाहेर पडत आपल्या बायकोला जे हवे असते ते देण्याचा प्रयत्न केला. राजाभाऊ तिला चक्क नाटकाला घेवुन गेले, तिला नाटकं पहाणे आवडते, ती तशी कॉलेजजीवनात नाटकात कामबीम करायची हे ठावुक असुनही गेल्या वीस वर्षात पाहिलेले हे कदाचीत पहिलेच नाटक असावे. ( तसं राजाभाऊंनी पण एकदा नाटकात काम करण्याचे धाडस केले होते, पण ते नाटक धाडकन आपटले होते कदाचीत त्यांच्याच मुळॆ )
फारच वाईट राजाभाऊ फारच वाईट वागलात तुम्ही प्रत्यक्षात. अगदी त्या नाटकातील पात्रे प्रत्यक्ष भेटीत जशी वागतात तशेच.
उगीच नाही ती म्हणाली " मला यात आपले प्रतिबिंब दिसले."
"मग भेट ना मला माझ्या ब्लॉग वर , नाही वागणार मी विचीत्र, खुप चांगला वागवीन मी तेथे तुला "
तर काय , आज एक मस्त नाटक पाहिले. बेहद्द खुश तबीयत, अधुन मधुन दिलखुलास हसणॆ, मस्त पैकी दाद देणॆ कलावंतांच्या अदाकारीला. बढीया.
व्हाईट_लिली ऍड नाईट_रायडर, इंटरनेट वर नेहमी इंटरेस्टींग चॅटीग करताकरता प्रत्यक्ष भेटायचे ठरवतात, झालच तर आयुष्यातही एकत्र ऐण्यासाठी. तिचा करारनामा असतो , लग्नाआधी शरीरसंबध ठेवुन आपण एकामेकाला अनुरुप आहे की नाही त्याची चाचणी घेण्याची आणि मग त्याची ही अट असते २४ तास आपण एकत्र एकामेकाच्या सहवासात घालवुन मग ठरवुया, पुढे पावुल टाकायचे की नाही ते.
ते भेटतात, ठरवल्याप्रमाणॆ करतात देखील .
पण ............
म्हणुन राजाभाऊचे देखील बायकोला सांगणे असते " माझ्याशी सुसंवाद साधायचा असेल तर मग भेट तर ..........., जलेम्बु, जलेम्बु, जलेम्बु "
रसीका जोशी आणि मिलींद फाटक सिंपली टेरीफिक. मस्त कामं केली आहेत.
No comments:
Post a Comment