Wednesday, March 11, 2009

गौरी देशपांडंच "एकेक पान गळायला "

गौरी देशपांडंच "एकेक पान गळायला " वाचायला घेतलय.  

कंटाळा येत चालला आहे आता गौरी देशपांडेंचा. बास झाले आता तिची पुस्तके वाचणॆ. दुसरा मार्ग काढायला हवा.


भरभरुन बहरलेल्या , फुललेल्या बहावा विषयी, सीता अशोकाबद्दल, पळासाबद्दल, तामण संबंधी फुल फुल फुलुन जावुन भरभरुन कोणाकडे तरी बोलायला जावे आणि त्यानी ही नावे पहिल्यांदाच ऐकली असावीत आणि रुक्षपणा दाखवत आपल्याला पोळुन टाकत रहावे या पेक्षा आपणच तुसडेपणाने वागलेले किती तरी बरे.  संवादापेक्षा विसंवादच बरा ना. 

तुसडॆपणा. लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे म्हणुन  चांगलेसुरखे वागत रहायचे तर आता मग त्यांनी लांब रहावे म्हणुन फटकुन वागायच. अंगावर येणारी आपल्याकडची नाती तर्हेवाईक पणाने वागुन तुच्छतेने वागवत, तोडुन टाकणे अवघड वाटत नसले तर मग तिच्याकडच्या नात्यांसाठी गुंतुन रहायला जमत नसतांना देखील वेगळे  वागावे का तर  वाटते  काहीतरी  तिच्यासाठी म्हणुन. पण एकुण कंटाळा येत चालला आहे , सर्व काही निरर्थक धडपड करायची.

शेवटी गौरी म्हणते " तो जणू सगळ्यांना म्हणतो : गोड वागणारं, सुरेख , पैशेवालं माणूस काय कुणालाही आवडॆल. पण मी असा आहे. मोठाथोरला, कुरूप आणि वाईट वागणारा. असा जर तुम्हाला आवडलो तर खरं "

पण आवडावेच का. तिरस्कार केला तरी चालण्यासारखं आहे 

आठवायला बघतोय एखादी अशी व्यक्ती   जी भेटल्यावर आपल्याला खुप खुप आनंद होईल , अगदी खळाखळून , मनापासुन ह्सु

No comments: