Wednesday, March 04, 2009

धारावी

धारावी , आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी. याचे चित्रण स्लमडॉग मिलिनीयनर मधे पाहीले, त्या निमीत्ते बऱ्याक चर्चाही झाल्या. पण त्यातुन विदारक बाजुच समोर आली.
याला आणखीन एक पैलु आहे, विधायक कार्याचा. येथल्या नरकासमान, गलिच्छ वस्तीत रहाणाऱ्या माणसांचे रहाणीमान सुधारावे यासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांचे, जे परत एकदा जगासमोर यायला हवे।

भरलेले नाले, कचऱ्याचे डोंगर,अगदी दारापर्यंत आलेले, ती दुर्गंधी, ती रोगराई, कसे जगत असतील येथे माणसे ? हे चित्र बदलण्याचा विडा उचलला होता मुंबई महानगरपालीकेने, त्यांच्या "दत्तक वस्ती योजना " अंतर्गत, आणि विशेष कार्यकारी अधिकारी श्री। सुभाष दळवी यांनी.
आणि काही दिवसात हे रुप पालटले गेले. प्रशासन व लोकसहभाग यांच्या समन्वयाने काय शक्य आहे, होते याचे हे जल्वंत उदाहरण होते, या स्वच्छता मोहीमेने श्री दळवी यांना राष्टपती पुरस्कार मिळवुन दिला, या मोहीमेवर एक डॉक्युमेंटरी फिल्म देखील बनवली गेली।
हे शिवधनुष्य उचलणे फार अवघड होते, घाणीतच रहाण्याची सवय झालेल्या लोकांची मानसीकता बदलणे, गुंड प्रवृत्तेच्या लोकांना, माणॅसांच्या उदसिनतेला, अनेक हस्ताक्षेपांना तोंड देणे, वैयत्तेक हेवे दावे, राग लोभ रुसवे फुगवे या साऱ्या उणीवांवर मात करत तेथल्या रहिवाश्यांनी हा कायापालट शक्य करुन दाखवला, श्री सुभाष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली

नेमके तेथे काय घडले ?
क्र.

No comments: