Saturday, March 28, 2009

सीता अशोक

काल डॉ.सानेबाईंनी चैत्रपालवी या कार्यक्रमामधे सीता अशोक आणि कालीदासाचा ओझरता उल्लेख केला.

काय म्हणातो महाकवी कालीदास सीता शोक बद्दल .



भोवती वसंत बहरला होता. सारी सॄष्टी रंगली होती. दंगली होती, फुलली होती.गंधली होती.गात होती.झुलत होती.नाचत होती.
मधेच हा अशोक होता -
चांगला डवरलेला. पोसलेला. पण अजुन न फुललेला. मुका. एकटाच. जणु प्रियेची प्रतीक्षा करणारा.
संगोत्सुक !
तो वाट पहात असतो, ऋतुमयीची.
तिने यायचे. आपल्या कोवळ्या पावलांनी त्याला स्पर्श करायचा. अळीत्याने पाय शॄंगारुन, अलंकार घालून पैंजण छुमकवीत होणारा हळुवार स्पर्श.
मग तो रोमांचित होणार. शहरणार. फुलणार.


पाय लावुन झाल्यावर मालविकेने विचारले, ’सये, आपण याचे एवढे लाड केले. आता हा फुलेल ना ?"
न फुलला तर हा उणेपणा तुझा नव्हे.
असे का ?
इतक्या सुंदर पावलांचा स्पर्श होवुनही जर तो फुलला नाही तर तो अरसीक ठरेल. वेडा ठरेल

अग्निमित्राला नशिबाचे नवल वाटले -
- जो अरसिक ठरण्याचा संभव होता त्याला प्रीतीचे समर्पण झाले होते
- मालविकेची ही पावले -
- जणु फुललेली सुंदर लाल जोडकमळे.
- तिचे शेलटे लांब पाय ते या कमलाचे नाल.
- कटितळीचे रूप-वैभव ती या कमलवेलीची कंदमूस.
- नूपुरांची छुमछुम ती जणू तिच्या अंतरीचे जीवनसंगीत
- या साऱ्याचे वैभव या अशोकाला लाभले.
- आणि हा अरसिक शांत उभा आहे.
-अजुन फुलांनी फुटलेला नाही.
-हेच भाग्य माझे असायला हवे होते.
- मी या वेळी फूल फूल फुललो असतो.
- अरसिक अशोका !
-माझ्यासारख्या प्रेमिकाशी तुझी तुलना करतात.
- तूही रमणीच्या स्पर्शासाठी झूरतोस असे म्हणातात.
- ते सारे खोटे आहे.

अशोक आजच फुलला होता. -
अगदी भरभरुन फुलला होता -
आजवर कधी नाही असा उमलला होता.
: याचे हे सौंदर्य अतुलनीय आहे.
: असाधारण आहे.
: सारी वसंतश्री याच्या वरुन ओवाळून टाकावी असे आहे.
: आधी फुललेली झाडे उगाच क्षणाचा दिमाग दाखवून गेली.
त्या सर्वांची एकत्र शोभा आता याच्यावर फुललेली आहे.


ज्या अशोकाचे, महाकवी कालीदासाने "माविकाग्निमित्र" या कादंबरीत मुक्तहस्ते वर्णन केलय. अग्निमित्र व माधवीचे, मालविकेचे मिलन घडुन आणण्यासाठी त्याच्या खुबीने वापर केलाय, त्या अशोकाची आठवण जरा अंमळ उशीराच झाली. ( वरील भावानुवाद - "मालविका " लेखक आनंद साधले मधुन साभार. "

2 comments:

Vivek S Patwardhan said...

Dear harekrishnaji,
You have indeed chosen the REAL Ashok. The popularly called Ashok does not flowerr like as shown in your photograph. You will find this in Jijamata Udyan and in UDCT [now UICT] garden at Matunga. I love this tree, Thanks for bringing Kaidas on Ashok Tree to us.
Vivek

HAREKRISHNAJI said...

Dear Vivek Patwardhan,

I have seen fully bloomed Sita Ashok in OP Garden. Aarey Colony Goregaon 20 years back, I had gone there with my would be.

डोक्यात भरलेला कालीदास, समोर आलेले आणि संपुर्ण फुलांनी डवरलेले नखशिखांत भरलेले ते वैभव , मी आणि ती , नुकतेच लग्न जमलेले. हा सीता अशोक विसरणे नाही

I searched so much for bloomed Sita Ashok till last year. You won't believe,yesterday I found 2 trees right under my nose. I just have to stand in the balcony in Pune and look down, that's it.