काल सुरेख गाणॆ ऐकले, बऱ्याच दिवसांनी, सौ.वर्षा नेने यांचे.
संस्कार भारती यांनी आयोजीत केलेल्या मासीक संगीत साधना मधे.
पुरीया धनश्रीने सुरु झालेली मैफील मग भजने, नाट्यगीते यांनी फुलत गेली.
श्री. शौनक अभिषेकी गात असलेले व लोकप्रिय भजन "अभीर गुलाल उधळीत रंग " हे भजन त्यांनी वेगळ्याच चालीत म्हटले. छान वाटले ऐकायला.
आणि गाणॆ संपल्यानंतर तर आणखीनच मजा आली, चक्क चैत्राचे प्रयोजन साधुन चविष्ट आंबाडाळ वाटण्यात आली.
No comments:
Post a Comment