आज संध्याकाळी राजाभाऊंना श्रुती मंगल कार्यालयात भोजनाला जायचे आहे आणि त्यातुन परत उकडीच्या मोदकाचा बेत आहे. मग काय विचारता, तयारी सकाळ पासुन सुरु आहे.
कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है.
मुंबईवरुन येणाऱ्यांना एक काम सोपवले होते, येता येता तळेगावचा टोल नाका पास झाला की जो पेट्रोल पंप येतो तेथल्या भगत ताराचंद कडे उत्तम "डाल फ्राय" मिळते ती येतानां घेवुन येणॆ.
त्यांनी बिचाऱ्यांनी ती आणली देखील. पण महालालचे ने लाचचे वर डोके काढले.
राजाभाऊ , दुपारचे जेवण जरा जपुन , अंमळ कमीच खा हो. रात्रीचा बेत याद आहे ना.
मग काय "माझ्यासाठी फक्त वरण भात टाक. " एक ऑडर, बायकोला.
रत्नागीरीचे ओले काजुगर सध्या बाजारात आले आहेत. आज त्याचाही बेत होता. पण त्याला जरादेखील हात लावला नाही राजाभाऊंनी.
मोदक उकडीचे मोदक. श्रुती मंगल. मोदकाचा बेत.
हाणायचे बर का आज गणप्या.
2 comments:
I was not able to read the picture looked good! Cashew chicken?
No. it's Cashew ( the wet one, its available only during Feb. ) with coconut.
I have written that I sacrificed such lovely veg.dish cooked in the afternoon for Ukadiche Modak , which I am going to eat in the dinner
Post a Comment