Tuesday, March 31, 2009

असे झाले तर

काल लोकसत्तामधे आचार्य कृपलानी बद्दल माहिती आली होती। एवढे मोठे व्यक्तिमत्व पण निवडणुकीत एका नगण्य उमेदवाराकडुन त्यांना पराभुत व्हावे लागले । निवडणुकीत काय होईल हे सांगणे कठिन असते । स.का.पाटिलांना, अगदी इंदिरा गांधींना देखील पराभव स्विकारायला लागला होता।
मतदारसंघ बदलल्यामुळे आपल्या राज्यातील हेवीवेट उमेदवारांचा पराभव झाला तर ?

3 comments:

Girish said...

हे उमेदवार ’हेवीवेट’ असतील तर त्यांचे फारसे काही बिघडणार नाही.२००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनही शिवराज पाटील आणि पी.एम.सईद यांना ते सोनिया गांधींच्या मर्जीतले असल्यामुळे (आणि म्हणून हेवीवेट) मंत्रीमंडळात सामील केले गेले.पुढे त्यांना राज्यसभेवर निवडून आणण्यात आले.तशीच गोष्ट १९९८ च्या निवडणुकीत पराभूत झालेल्या प्रमोद महाजनांची.समजा एखादा ’हेवीवेट’ उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभूत जरी झाला तरी त्यामुळे त्याचे फारसे बिघडणार नाही.

HAREKRISHNAJI said...

Girish,

How about Shri Sharad Pawar ?

Girish said...

शरद पवारांचा पराभव होणे हे अशक्यच वाटते.तरीही चर्चेसाठी समजा त्यांचा पराभव झाला तर काय होईल ते बघू या.सध्याच्या परिस्थितीत पवार आता तिसर्‍या आघाडीच्या सभेला जाणार अशाप्रकारच्या बातम्या आहेत.तेव्हा त्यांचा पराभव झाला तर त्यांना काँग्रेस पक्ष तर थारा देणार नाहीच. तिसर्‍या आघाडीत पंतप्रधानपदासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून अनेक लोक तयार आहेतच तेव्हा तिथेही त्यांची डाळ शिजणे तसे कठिणच आहे.तेव्हा शरद पवार हे ’हेवीवेट’ हरले तर मात्र त्यांचे कठिण आहे.तशीच गोष्ट अडवाणींचीही.पण राहुल गांधी, पी.चिदंबरम,प्रणव मुखर्जी हे हेवीवेट हरले तरी ते मंत्री बनायला फारशी अडचण येणार नाही.तेव्हा पंतप्रधानपदावर डोळा लावून बसलेल्या हेवीवेटचा पराभव झाला तर त्यांचे कठिण होईल पण इतरांचे तितक्या प्रमाणावर नाही.