Thursday, April 02, 2009

एक सुखद क्षण

खुप दमुनभागुन , दिवसभर मर मर मरमरुन केलेल्या कामाने बेजार होवुन रात्री बिछान्याला पाठ टेकावी आणि लक्षात यावे अरे आपण दिवा मालवायला विसरलो आणि पांघरुणही घेतलेले नाही । अंगात उठण्याचे त्राण अजिबात नसते , जागचे हलवतही नाही , एवढे आपण थकलेलो असतो , ( हा मधला वेळ फार वाईट असतो, झोप डोळ्यावर आलेली असते आणि उजेड झोपुन देत नसतो ) , अश्या वेळी कोणी तरी हलक्या पावलाने यावे आपल्या अंगावर प्रेमाने पांघरुण घालावे व दिवा मालवावा।

पण हा सुखाचा क्षण नशिबात असायला हवा ।

2 comments:

मन कस्तुरी रे.. said...

म्हणजे असं घडलं की नाही?
बाकी याबाबतीत तुमच्याशी एकदम सहमत........पण बरेचदा...म्हणजे नेहमीच, मलाच दिवा बंद करावा लागतो....बरं न बंद करता तसंच झोपायचं असं ठरविलं तर मनाला सतत रुखरुख लागून झोप लागत नाही!

HAREKRISHNAJI said...

काल माझ्या बायकोला तुमची कॉमेंट सांगीतली. तिचेही हेच म्हणणॆ आहे