उलटतपासणी सुरु झाली.
"ही तुझी दुसरी वेळ."
"नाही. पहिलीच."
डोळ्याला डोळा न भिडवता तोंडातल्या तोडात पुटपुटत उत्तर.
"खोटे बोलु नकोस. ही तुझी दुसरीच वेळ आहे, पहिल्यांदा फोर्टमधे आणि आता हिरानंदानी मधे. ("आम्हाला घेवुन न जाता " हे न बोललेले वाक्य सर्वात महत्वाचे )
'गुन्हा कबुल आहे."
त्याचे असं झाले.
काही महिन्यापुर्वी काही ब्लॉगर्स , आपली ओळख केवळ ब्लॉगपुरती सिमीत राहु नये या विचाराने एकत्र आले होते, अंधेरीच्या एका हॉटॆलात गप्पागोष्टी करत जेवायला गेले. आता पुढच्या महिन्यात परत भेटायचे हा वायदा करत. (पुढचा महिना उजाडायला मधे तीन महिने जावे लागले. )
काही दिवसापुर्वी सिझलर्सचा एक फोटॊ माझ्या ब्लॉगवर मी टाकला होता. मग त्या वरुन " आपण या वेळी योकोत सिझलर्स खायला जायचे का ? " या चर्चेला जी सुरवात झाली त्याचा शेवट अखेरीस काल झाला. आम्ही पाच जण हिरानंदानी मधे योकोत सिझलर्स खाण्यासाठी जमलो. म्हणजे खाणे हे तसे निमीत्यपात्र. एकत्र जमुन खुप गप्पा मारायच्या हे मुख्य उद्दिष्ट ( मी आणि गप्पा ? काहीतरीच काय . सांगु द्या तिला आपल्या नवऱ्यानी कधी तिच्याशी मनमोकळेपणे गप्पागोष्टी केल्या आहेत ते आपला विक्षिप्त,चक्रम नवरा माणुसघाणा आहे ते ठाम मत )
तर तिला टाकुन आपल्या नवऱ्याने एकट्याने जावुन दोनदा योकोमधे सिझलर्स हाडादले याचा तिला भयंकर सात्वीक संताप आला.
दिवस दुसरा.
"तुला माहिती आहे काय गं, या दिवसात दुर्वांकुर मधे थाळीत अमर्यादित आमरस असतो, चल जावुया आज "
नशिब रे, बायको थोडक्यावर पटली म्हणायचे.
मग काय, दुर्वांकुर आणि तुटुन पडणॆ आमरसाच्या वाटीवर. वाटीमागुन वाटी रित्या होत गेल्या, नाही वाढणारा कंटाळला, नाही त्यानी हात आखडता घेतला, नाही हाणणाऱ्यानी.
तॄप्त मनाने घरी परतलो.
पण.
शेवटचा, अखेरचा शब्द तिचा होता. ( आणि नवऱ्यांना वाटते आपणच हुशार )
"तुझ्या सदविवेक बुद्धीस स्मरुन सांग मला. सिझलर्सचे परिमार्जन दुर्वांकुरने होत नाही. लक्षात ठेव, पुढच्या आठवड्यात आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे विसरु नकोस .’
3 comments:
तुमच्या ब्लॉग मधला तिसरा फोटो पहिला , अणि एकदम आपण हे बघितल्या सारखा वाटलं कुठेतरी..
मग वाटलं, "अरे, हे तर दुर्वान्कूर !
पुढे ब्लॉग वाचल्यावर कन्फर्म झालं ......
सदाशीव पेठेत, स. प. जवळ रहिल्याचा परिणाम....:-)
Good idea. I will also try giving Aamras to my wife.
We have had South Indian food when we met first, Sizzlers when we met on second occasion.
What's your suggestion for the third meeting?
Vivek
Dear Suranga,
May be next time we should arrange for trip and meet in Pune for lunch then.
Dear Vivek,
How about Gujrati Thali ? Nowadays Most of the gujrati restaurants serves aamras in thali. Today only we all from office went to Samrat at churchgate and enjoyed thali.
Post a Comment