स्वीस बॅंकेत ठेवलेला, न ठेवलेला , असलेला किंवा नसलेला बेहिशोबी पैसा भारतात परत आणा म्हटल्यावर सर्व खुष. लगेच माना डोलायला लागतात. माझ्या लहाणपणापासुन मी हे ऐकत आलो आहे परत आणा, परत आणणार, आणणार, पण अजुन पर्यंत तरी पैश्याचे काय झाले हे कळलेले नाही.
"भारतातील सर्व काळा पैसा उघडकीस आणु" . या घोषणेत तेवढा जोर नाही , अपील नाही व ती अडचणीची देखील असावी.
जेव्हा सुखराम सारख्या एखाद्या नेत्याच्या घरी छापा मारला जातो , तेव्हा पैसे कोठे आणि कसे ठेवावेत किंवा आता जागाच राहिली नसल्यामुळॆ मग ते उश्यांच्या अभ्रात, चादरीत बांधुन त्यांची बोचकी करुन ठेवलेले मिळतात. काही लोकप्रतिनिधी मत देण्यासाठी मिळालेला काळा पैसा बुद्धुपणॆ सरळ बॅकेच्या बचत खात्यात जावुन भरतात व पकडले जातात.
गल्लीतले कालचे कार्यकर्ते गळ्यात जाडजाड सोन्याच्या चेनी ( चेन नव्हे चेनी ) घालुन , गाड्या उडवीत फिरु लागतात, निवडणुकीत उमेदवार कोट्यावधी उड्डाणे घेतात.
तेव्हा सध्या भारतातच असलेला बेहेशीबी पैसा बाहेर आणला गेला तरी पुरेसा आहे, स्वीस बॅक तर दुर राहिली.
2 comments:
स्वीस बॅंकेत ठेवलेला पैसा परत आणने कठीणच नव्हे अशक्य आहे. स्वीस बॅंका जगातील सर्वात गुप्तता पाळणाऱ्या बॅंका म्हणुन ओळखल्या जातात. स्वीस कायद्यानुसार संपत्त्तीची घोषणा करणे गरजेचे नाही. तसेच जर कोणी गुप्त माहिती उघड केली तर त्यास 5-6 वर्षे शिक्षा होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा दावा पुर्णपणे फोल ठरणार आहे यात कोणता वादच नसावा.
- वामन परुळेकर
प्रिय वामन,
मला हेच म्हणायचे आहे. मुळात असा पैसा भारताबाहेर पाठवता येतो का या बाबत माझ्या मनात संशय आहे. RBI व Enforecement Directorate यांचे चलनावर कडक नियंत्रण आहे.
पण हे सारे अज्ञानी जनतेच्या भावनांशी केलेले खेळ आहेत.
Post a Comment