Sunday, February 08, 2009

बाजा गाजा ईशान्येचा.

ईशान्य मॉल. पुणे शहराच्या ईशान्येला, नॄत्य, नाट्य, संगीत, चित्रकला आदी अभिजीत कलांचे नवे केंद्र रसिकांसाठी नेहमीच आनंददायी झाले आहे.  मॉल हे फक्‍त खरेदीकरता, भटकायला व हादाडायला जाण्याची जागा नाही हे ईशान्य मॉल नी साबीत केले आहे.

गेली दोन दिवस ईशान्येत नुसती निव्वळ धम्माल चालली आहे. 

The Theme is MUSIC FROM 21ST CENTURY INDIA.

संगीत म्हणाजे संगीत असते, त्यांचे आमचे  सेम असते.

संगीतावर थिरकणाऱ्या तरुणाईच्यांसोबत त्यांच्या पावलांवर पावले टाकत जल्लोशात सामील होतांना काय मजा आली. संध्याकाळाची रम्य वेळ, मस्त पैकी नशीला माहोल, समोरील रंगमंचावरील, चित्रविचीत्र केस असलेले, दाढ्या ठेवलेले, रंगिबेरंगी कपडॆ आणि हाती गिटार , ड्रम असलेलेल्यांनी काय धम्मल केली. फ्युजन लोकसंगीताच्या स्टाईलीत, धुन मधे.   लोकसंगीत जेव्हा या नव्या रुपात पेश केले जाते तेव्हा ते खरोखरीच लोकांचे होवुन जाते. मस्त पैकी भावते. 

दोन बॅंड गॄपनी सादर कार्यक्रम केलेली गाणी ऐकली. त्यानंतर ’यक्षगान" होते. देवकी पंडीत , राकेश चौरसीया, सुमीत्रा देवी, संजोय दास, हितेश पटेल यांचा कार्यक्रम होता, पण वेळॆअभावी थांबता आले नाही. 

तस बघायला गेले तर हा मॉल खुप लांब पडतो. 

या विभागात जाण्याचे काल दुसरे एक प्रयोजन होते.  "फॅब इंडीया" मधे खरेदीला जायचे होते.  जहांगीर हॉस्पीटल समोरील फॅब इंडीया मधे मस्त आहे

आता एकाच आडवड्यामधे त्यांच्या व्हेलेंटाईन चा वाढदिवस, व व्हेलेंटाईन डे येतो आता याला काय करायचे. 

एक ड्रेस वाढदिवसासाठी , दुसरा व्हेलेंटाईन डे साठी, मग तिसरा तिला आवडला म्हणुन ! 

राजाभाऊंची एक वाईट सवय आहे. एखादी गोष्ट आवडली की मग तीच नी तीच न तीच. मग ते त्याच दुकानात जात रहातात, त्याच खाद्यगॄहात जात रहातात.  
 
(अजुन मुलाला कळलेले दिसत नाही, आपल्या बापाने काय केले आहे ते. आता त्याचे डिमांडस चालु होतील. बॅलंसींग सांभाळण्यासाठी.)   

No comments: