"कुठे आहेस ? काय करतो आहेस ? केव्हा येणार ? वाजले किती ? कुठे आहेस ? काय चाललयं ? "
मोबाईलचा वापर केवळ याच सवालांसाठी, बार बार लगातार.
" किती वेळ ? अजुन किती वेळ लागणार आहे ? "
आता राजाभाऊंना अचानक " योको " मधे जावुन सिझलर्स खाण्याची हुक्की आली, त्याला ते तरी काय करणार "
मुड काय असा सांगुन बनत असतो ? तरी खार येथील "योको" मधे जाण्याचे त्यांनी टाळले. खरंतर राजाभाऊंना खाण्यासाठी " पृथ्वी " मधे जायचे होते कारण त्यांच्या सोबत सर्व "यंग" होते.
नेहमीप्रमाणॆच बाप सांगेल, बोलेल त्याच्या विरुद्ध करण्याची सवय असलेल्या त्यांच्या मुलाने "पृथ्वी " त जाण्यास नकार दिला. त्याला अजुन माहिती नाही "पृथ्वी " काय चीज आहे.
राजाभाऊंना त्याचे मन मोडवेना, कुठे जेवायचे , कुठे जेवायचे म्हणता म्हणता भुकेल्या पोटी लिंक रोड वरुन मालाडला जातांना त्यांची नजर लोखंडवाला मधल्या "योको" वर गेली.
किती दिवस झाले योकोत सिझलर्स खाल्ले नव्हते.
आता परत मुलगा नको बोलतो की काय या विचारात ते पडले.
मग त्यांनी मुलाला योकोच्या बाजुच्या उपहारगृहात जावुया म्हणुन सांगितले.
युक्ती सफल झाली.
या योकोत त्यांना सिझलर्स खुप मस्त मिळाले.
व्हे. शासलीक सिझलर्स विथ फ्राईड राईस,
व्हे, सिझलर्स विथ बेकड बिन्स, नुडल्स , गार्लीक.
बायकोची एक सारखी , सतत भ्रमणध्वनी प्रश्नांची फैर.
"कुठे आहेस ? काय करतो आहेस ? केव्हा येणार ? वाजले किती ? कुठे आहेस ? काय चाललयं ? "
"कुठे आहेस ? काय करतो आहेस ? केव्हा येणार ? वाजले किती ? कुठे आहेस ? काय चाललयं ? "
"किती तरी दिवस झाले "योको" मधे सिझलर्स खाल्लेले नाही "
मग नवऱ्याकडे नवी फर्माईश.
2 comments:
काका काहीतरी योगायोग आहे...मागच्या मे मध्ये आलो होतो तेव्हा मालाडच्या 'योको' मध्ये गेलो होतो आणि बरोबर एक वर्षांनी राजाभाऊ तिथेच जाताहेत....हम्म...आठवणी आठवणी....चार्रर्र्र्रर्र्र्र होतंय सिझलरच्या नावानंच
मला आतापर्यंत फक्त मुळचे खार येथील योकोच आवडत होते.
आता लोखंडवाला मधले जास्त आवडायला लागले आहे.
Post a Comment