आले आले आले.
अखेरीस कार्लेकरांच्या अस्सल देवगडच्या हापुस आंब्याचे मुंबईत विलंबाने का होईना आगमन झाले आणि फक्त कार्लेकरांच्या हापुस आंब्या शिवाय इतर आंबे व्यर्जीत मानण्याऱ्या राजाभाऊंच्या पोटाला, जिव्हेला , मनाला त्यांनी सुखावले.
सौ. कार्लेकर या दिवसात दादरला गोडबोलेंच्या बाजुला दुकानात आंबे विक्री करतात.
गेले कित्येक वर्षे राजाभाऊ केवळ देवगडचेच हापुस खात आले आहेत आणि ते ही फक्त कार्लेकरांकडचेच.
2 comments:
देवगड हापूस रत्नागिरीपेक्षा कैकपटीने उत्तम असतो.. मध्ये मात्र रत्नागिरी हापूस जास्त चांगला असा बूट निघाला होता. असो.. मी देखील नित्यनियमाने देवगड जिंदाबाद.. ठाण्यात देवगडचे 'काळे' यांचा हापूस मिळतो... कामावर यायच्या आधी थोडा आला होता तो हाणला... :)
अरे, काल बोलला असतात तर. मी ठाण्याला आलो होतो. काळेंनी काळेंचे हापुस चाखले असते
Post a Comment