Wednesday, July 09, 2008

हर नर्मदे - मां तु तो जीवन देती है !


नर्मदेच्या क्षितिजापार- लेखीका - सौ. लीला शाह



एक असे पुस्तक वाचायला घेतले आहे की जे वाचु म्हटले तरी वाचले जात नाही. प्रत्येक प्रकरण, प्रत्येक पान, प्रत्येक परिच्छेद, प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द अस्वस्थ , व्यथीत, अंतर्मुख व्हायला भाग पाडतात.



सरदार सरोवर, नर्मदा बचाब आंदोलन, मेघा पाटकर यांच्या बद्दल सविस्तर माहीती देणारी ही कादंबरी वाचतांना ज्या यातनांमधुन ही लोक गेली आहेत ते वाचतांना मन सुन्न होते.



असे कसे आपण निगरगट्ट, संवेदनाहीन, जे आपल्या विस्थापीत, प्रकल्पग्रस्थ लाखो भावंडांना विसरुन गेलो आहोत ? केवळ आपण शहरात सुरक्षीत आहोत म्हणुन ? नळ उघडल्यावर त्यात त्वरीत पाणी येत म्हणुन ? विजेचे बटन दाबल्यावर लगेच दिवा लागतो म्हणुन ?



लाखो माणसांना त्यांच्या जन्मभुमीपासुन, कर्मभुमीपासुन उखडुन टाकुन आपण काय साधतो ? काय कमावतो ? का कशासाठी हे भले मोठाले प्रकल्प बळाचा वापर करुन राबवले जातात ? का ? कोणासाठी ? कशासाठी ?



पुस्तक वाचतांनाच जर मनाला वेदना होत असतील , यातना होत असतील, मन बधीर होत असेल तर प्रत्यक्षात आपले घरदार, जमीन, व्यवसाय, जगण्याची साधने हिसकावली जात असतांना, अत्याचारांना बळी पडत असलेल्यांचा, वेदना सहन करणाअऱ्यांच्या, यातनेने पिचुन जाणाऱ्यांच्या मनाचे काय होत असेल याचा विचार करवतच नाही.



(क्र.)


No comments: