Sunday, April 08, 2007

पं. मुकुल शिवपुत्र व राहुल देशपांडे

पं. मुकुल शिवपुत्र

राहुल देशपांडे
श्री. मुकुल शिवपुत्र नामक अवलियाचे स्वर्गीय संगीत, गाणे ऎकण्याचे भाग्य कुणा भाग्यवंतालाच लाभत असावे. नशिबाने माझी गणती त्यात होणे आहे. आज सकाळी पुण्यात, गरवारे सभागृहात, कुमार गंधर्व जयन्ति समारोह निमित्ते मुकुल शिवपुत्रांचे गाणे ऎकण्याचा मणिकांचन योग जुळुन आला.
आनंदाने परीसीमा गाठल्यावर त्या क्षणी " बस्स मौत अगर आनी है तो इसी वक्‍त आये " असे भावना व्यक्‍त करतांना म्हणायची पद्धत आहे, मला तर अशी मौत बार बार स्वीकारत जगायला आवडेल.
आज मुकुल शिवपुत्रच्या साथीला तानपुऱ्यावर राहुल देशपांडे होते. राहुलजीचे मी ४-५ वर्षापुर्वी इंदोरला दिवाळीत पाडव्याच्या पहाटे प्रथम ऎकले त्या क्षणापासुन मी त्याच्यावर फिदा झालो आहे. त्यांनी त्यावेळी जवळ जवळ ३-४ तास नाट्यगीते गायली होती. गेल्या वर्षी विलेपार्लेला त्यांचा शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला सुद्धा मी गेलो होतो.
ह्या दोघांचा कार्यक्रम मी सहसा चुकवत नाही.

गायनातून शिवपुत्र यांची कुमार गंधर्वांना आदरांजलीपुणे, ता. ८ - युगप्रवर्तक गायक पंडित कुमार गंधर्व यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुत्र, शिष्य आणि प्रतिभावंत गायक पं. मुकुल शिवपुत्र यांच्या गायनाची सकाळची विशेष मैफल आज रंगली. कुमारांच्या अनोख्या बंदिशींचा आनंद तर त्यांनी दिलाच; पण स्वतःच्या एका वेगळ्या शैलीचाही सुरेल प्रत्यय दिला. ........कुमार गंधर्वनिर्मित "धूनउगम' रागांपैकी एक "बिहाडभैरव'ने मुकुल यांनी मैफलीचा प्रारंभ केला. विलंबित त्रितालातील "ये हो रे श्‍याम' आणि त्याला जोडून द्रुत त्रितालातील "बना बनी आयो' ही रचना त्यांनी सादर केली. त्यानंतर "पिलू' रागातील "धूली भरे अती सोभित' हे रसखान यांचे पद त्यांनी गायिले. मध्यंतरानंतर त्यांनी राग "खट'मधील "आयी अंबुवा' ही बंदिश, "देसकार' रागातील कुमाररचित "आ दिलबरा' ही बंदिश पेश केली. "छैलवा न डारो गुलाल' या भैरवी ठुमरीने मुकुल यांनी आपल्या गायनाची सांगता केली. त्यांना सुरेश आचरेकर (तबला), सुरेश फडतरे (हार्मोनिअम), राहुल देशपांडे आणि विनय चित्राव यांनी तानपुऱ्यावर साथ केली.

No comments: