आणि अचानक बघताबघता खुंटीवर टांगलेल्या साडीने पेट घेतला. नक्कीच भानामती ही. काळी जादू, अंगावर बिब्ब्याच्या फुल्या उठवते, कपडे फाडते, जाळते, घरावर दगड, लिंबु टाकते, कोणीतरी अद्रुश्य अमानवी शक्ती हे घडवुन आणत असावी.
जरा थांबा, विचार करा, आपण शाळेत रसायनशास्त्र शिकलो आहोत, ते आठवा, कार्बन-डाय-सल्फाइड व पिवळा फॉस्फरस ह्याचा हा खेळ, कोणीतरी व्यक्ती तुमच्या नकळत तुमच्या कपडयावर हे लावते, कार्बन-डाय-सल्फाइड हे बाष्पनशील आहे, त्याची वाफ होते व कपडयावर पिवळा फॉस्फरस उरतो, सर्वसाधारण तपमानाला तो पेट घेतो त्यामुळे कपडे आपोआप पेटतात.
हेच मिश्रण मेणबत्तीच्या टोकावर लावा, देवाचा चमत्कार, मेणबत्त्या आपोआप पेटतात,
दक्षता : रसायने फार काळजीपुर्वक हाताळणे, पिवळा फॉस्फरस हाताने हाताळू नये.
साभार : महाराष्ट अंधश्रद्धा निर्मुलन समिती ह्यांच्या "अंधश्रद्धेची दुनिया, चमत्काराची किमया " ह्या पुस्तकातुन.
No comments:
Post a Comment