Wednesday, April 18, 2007

बाई तुझ्या सौभाग्याला धोका आहे.


बाई तुझ्या सौभाग्याला धोका आहे. भगत म्हणाला. बाईंची भितीने तारांबळ उडली. तळहातावर चिमुटभर कुंकू भगताने ठेवले. मुठ बंद करा. मुठ उघडल्यावर आतले कुंकू काळेठक्कर पडलेले. बाई गर्भगळीत झाल्या. तुमच्या नवऱ्याच्या वाईटावर तुमच्यावर जळणारी जवळचीच व्यक्ती आहे, त्याने करणी केली असुन, मुठ मारली आहे त्याने ही त्याचा हा पुरावा, तुमच्या सौभाग्याची निशाणी असलेले हे लाल कुंकू काळे पडले.
ह्यावर उपाय काय महाराज ? करणी उलटावी लागेल , खुप खर्च येइल. काही हरकत नाही, बुवा माझी तयारी आहे. बाई पैसे देतात, बुवा करणी उतरवतो.
बाई दुसरा हात पुढे करा, तळहातावर हळद ठेवली जाते, मुठ बंद करा. आता मुठ उघडा. पिवळी हळदीचे लाल कुंकू होते. बाई, तु नशिबवान, धोका टळला, बाईंनी सुटकेचा निस्वास सोडला.
अश्यारीतीने कित्येक भोळ्या बायका ह्या साध्यासोप्या चमत्काराला फसत असतील.
कुंकवात, हळदीत, थोडीसी कपडे धुण्यासाठी वापरली जाते ती डिर्टजंड पावडर, सर्फ़, निरमा, टाईड ई. मिसळा व ह्या प्रयोगाला सिद्ध व्हा. ऊन्हाळ्यात हात घामजलले असतातच अन्यतहा हात स्वच्छ धुवुन घेण्यास सांगणे.
साभार : महाराष्ट अंधश्रद्धा निर्मुलन समिती ह्यांच्या "अंधश्रद्धेची दुनिया, चमत्काराची किमया " ह्या पुस्तकातुन.

No comments: