Wednesday, April 25, 2007

सवाल

"राज्यातील साडेचार लाख मंदीरे, मठ व देवस्थाने यांच्या दोन लाख साठ हजार कोटी रुपयाच्या संपत्तीवर आणि दोन हजार कोटी रुपयाच्या वार्षिक उत्पन्नावर सरकारचा डोळा असल्याचा आरोप" - आज सकाळी ही बातमी लोकसत्ता मधे वाचल्यावर असंख्य सवाल माझ्या मनात आले.
माय गॉड, आपल्या राज्यातील मंदीरांची दोन लाख साठ हजार कोटी रुपयाची संपत्ती आहे ! ही एवढी संपत्ती आपल्या ह्या राज्यातील देवस्थानांची ? त्यात परत दोन हजार कोटी रुपयाचे वार्षिक उत्पन्न ? ह्या अफाट पैश्याचे होते तरी काय ? मग ह्या राज्यात रहाणारी असंख्य माणसे दळीद्री अवस्थेत का बरे राहिली आहेत ? हे राज्य असे डबघाईला का बरे आले आहे? आपल्या ह्या प्रगत राज्यास मागासलेली अवस्था का आली आहे ? शेतकऱ्यांना कर्जबाजारी अवस्थेत आत्महत्त्या का बरे करायला लागत आहेत ? पैश्याअभावी अत्यंत हुशार पण गरीब मुलांना उच्च शिक्षणापासुन वंचीत का बरे रहावे लागते ? ते तर जावुद्या, आज हजारो बालके प्राथमिक शिक्षणापासुन वंचीत का बरे रहात आहेत ? ह्या सर्व श्रीमंत देवस्थानांच्या पंचक्रोशीतील पाचपन्नास गावांचे स्वरुप अजुनही का बरे पालटुन जात नाही ? निदान ती देवस्थाने ज्या गावात आहेत ती गावे तरी अजुनही अशी दैनावस्थेत का बरे रहातात ? गावकऱ्यांना आपली गावे सोडुन रोजीरोटी साठी परगंदा का बरे व्हावे लागते ? अजुनही असंख्या बालके कुपोशणाचे बळी का बरे पडत आहेत? अजुनही सर्वसामान्याना परवडेल अश्या दरात वैद्यकिय सोयी सर्वत्र का बरे उपलब्द झालेल्या नाहीत ? ह्या सर्व अमाप संपत्ती चा विनियोग समाजकारणासाठी योग्य रीतीने का बरे केला जात नाही ? आज ह्या अमाप संपत्तीमधे आपल्या देशाचे भवित्तव्य पालटण्याची ताकद असुन सुद्धा तो असाच पडुन का आहे? आज दान करणारे हीच माणसे दर महिन्याला आपण रहातो तो विभाग स्वच्छ ठेवण्यासाठी महिनाकाठी १५-२० रुपये वर्गणी काढताना हात आखडता का घेतात ?
आज आपल्या राज्यातील देवस्थानांचे हे एवढे उत्पन्न तर सबंध देशात काय असेल ?

No comments: