Monday, April 02, 2007

हार्मोनी शो, नेहरु सेंटर

आर्ट, कला ह्या माध्यमाद्वारे भरपुर पैसे कमवायचे आहेत का ? एक मध्यम आकाराचा सफेद रंगाचा कॅनव्हास घ्यावा, बरेचशी सेफ्टी पिने ( बायका साडीला लावतात त्या ) घ्यावीत व ती कॅनव्हासवर सरळ रेषेत अडकावीत मधेच वेटॊळे घ्यावे व वरती डॊक्याकडे गोलगोल करीत उरलेली बाकी पीने लावत संपवुन टाकावीत रु. ३५,००० कमवाल. त्यापेक्षा बांधकामावर वापरली जाणारी रेती घ्यावी, ती सरळ जमिनीवर पसरावी, फाटक्यातुटक्या रबरी सपाता त्यावर पाऊलखुणा प्रमाणे मांडुन ठेवाव्यात जवळजवळ दोन लाख रुपये कमवाल. पण अट एकच तुम्हाला नेहरु सेंटर मधे दर वर्षी आयोजल्या जाण्याऱ्या हार्मोनी शो मध्ये तुमची कला सादर करण्याची संधी मिळाली पाहिजे.
ह्या हार्मोनी शो मधल्या कलाकॄती चांगल्या असतात ह्या बद्द्ल वादच नाही पण त्यांच्या किंमती पाहिल्यातर माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या मेंदूस झिणझिण्या येतात एकेका चित्राची किंमत लाखो रुपयाच्या घरात जाते. हि किंमतीची गहन गणिते सोडवणे माझ्या आकलना पलिकडचे आहे.
कोणी कलेचा जाणकार ह्याबद्द्ल मार्गदर्शन करील का ?

1 comment:

Abhijit Bathe said...

I WILL MAKE HIM AN OFFER HE CANNOT REFUSE -

asaa prakaar asel!