Thursday, April 12, 2007

स्टेटस , नरीमन पॉइंट, मुंबई.



उडीपी उपहारगॄहात इडली, डोसा खाण्यासाठी मागवला की त्याबरोबर सोबत छोट्या छोट्या, लहानग्या वाट्यांमधुन सांबार, चटणी दिली जाते. ह्यात काय मजा येत नाही बुवा. इडली, डोसा बरोबर बुडवुन खाण्यासाठी भरपुर सांबार, चटणी असली की कसे बढीया वाटते. मुक्तहस्ते खाता जिव्हा मस्तपैकी तॄप्त झाली पाहिजे.
जिव्हेचे हे चोचले पुरवण्यासी स्टेटस , नरीमन पॉइंट, मुंबई , सारखे उपहारगॄह नाही. त्याच्या बाहेरील काउंटरवर स्वस्तात व पटकन खाण्यासाठी दाक्षिण्यात्य पदार्थ गरमागरम मिळतात. सकाळी, दुपारी मात्र हे ऊभे राहुन खायला लागतात, सायंकाळी बसण्याची सोय केली जाते. आयुष्यभर मी येथे ओनीयन रवा डोसाच खात आलो आहे फारफार तर साधा डोसा.

पण स्टेटस जगप्रसिद्ध्य आहे ते त्याचा चवदार, रुचकर पंजाबी जेवणासाठी, गुजराती थाली खाण्यासाठी, केवळ हेच कारण आम्हास तेथे जेवणासाठी वारंवार जाण्यास प्रवॄत्त करत नाही, येथे केवळ शाकाहारीच जेवण मिळते हेही कारण थोडके नसावे. मांसाहरीसोबत मांसाहरी उपाहारगॄहात जाण्याचा मला तिटकारा आहे.
काजु मलई मटार, पनीर मेथी मलाइ, पनीर बटर मसाला , पनीर तिक्का मसाला, मलाइ कोफ्ता, दम आलू काश्मिरी, ह्या सर्व आमच्या आवडीच्या भाज्या. ह्या सोबत मग कुलचे, रुमाली रोटी हवेच. जीरा राइस, पीज पुलाव दाल माखनी तर हवेच हवे. त्याचे स्नेकस (हाच उच्चार) तर लाजबाव असतात.

आत प्रवेश करता येथील वातावरण, सजावट पाहुन मन कसे प्रसन्नचित्त होते. मोकळ्या मनाने, भरल्याखिश्याने जेवण्याचा आस्वाद घ्यावा. रविवारी मात्र आम्ही येथे जाणे टाळतो. अफाट गर्दीचा सामना करण्याची तयारी आमची तयारी नसते.

2 comments:

Monsieur K said...

2 mahine Nariman Point la ekaa client kade kaam karat hoto, tevha almost rojach Status madhe jevaaycho. gujju thaali, south indian snacks apratim aahet tithe! mala khichadi-kadhi solid aavadleli tithali. :)

~ketan

अनु said...

Mast. Varnan vachun tondala pani sutale. Photo pan chhan.