महालक्ष्मी रेसकोर्सला लग्नाआधी मित्राबरोबर व नंतर कुटंबियासमवेत मी नियमित,नित्यनेमाने भेट देत असे, अगदी अलिकडच्या काळापर्यत. खुप पैसे आतापर्यत मी घालवले असेन. खर्च केले असेन, रेसकोर्सवर. ह्यात अस्मादिकांची बायको आनंदाने सामील होत असे. (मी वाल्या कोळी का ?) त्यावेळी माझ्याकडे क्रेडीट कार्ड ही भरपुर होती. सह्या करताना मजाही येत होती. तारुण्याची नशाहि होती.
अलीकडे बरेच दिवस, महिने कि वर्षे ? झाले असतील गेलो नाही हो आम्ही "गॅलप्स" मधे रात्रीचे जेवायला. नेहमीचीच मध्यमवर्गीय रड, पैसाची चणचण. फार फार आठवण येत आहे त्या चवदार, रुचकर जेवणाची, त्या माहोलची.
गॅलप्स हे महालक्ष्मी रेसकोर्सच्या आत असलेले अप्रतिम उपहारगॄह आहे. कौटीनेन्ट्ल व भारतीय (गोवा, पंजाबी, हैद्राबादी, ई.) पदार्थ खावेत तर येथेच. येथे जाण्यासाठी आपण टर्फ़ क्लबचे सभासद असण्याची गरज नाही.
आम्ही पडलो शाकाहारी त्यामुळे केव्हाकेव्हा मासांहार करणाऱ्यांचा हेवा वाटतो. आम्ही आपले पनीर माखनवाला, कडई पनीर, पनीर दम पुख्त, कोर्न कॅप्सिकम, वेज. कोफ़्ता करी, पहाडी साग भुर्जी, मा की डाल. हर हर की डाल, सब्जी का पुलाव आदिवर समाधान मानतो. पण मांसाहार करणाऱ्यांची मात्र येथे चंगळ आहे.
अगदी छान पैकी आरामात गप्पाटप्पा करीत गॅलप्सात "फ़ौर कौर्स डिनर" घ्यावे. सुप, जेवण्याआधीचे चघळणे, मुख्य जेवण व त्यानंतर ऍपल पाय विथ आईसक्रीम किंवा चोकलेट मुस खाण्यास विसरु नये.
तॄप्त मनाने, भरल्या पोटने बाहेर पडावे.
आता आम्हाला एखादा क्षण साजरा करण्यासाठी गॅलप्सा मधे जायलाच हवे
No comments:
Post a Comment