Saturday, April 21, 2007

गणपती आराधना


सर्वप्रथम वंदना । गौरीशंकरनंदना
सकलभक्त पावना। सर्वार्थ साधना
भवाग्नीत पोळलो रे । भवजली बुडलो रे
भवतापे तापलो रे । भवानी सुता
संकटी सापडलो रे । संसारात पडलो रे
व्यर्थ धडपडलो रे । संकष्टीपावना
सुटण्यासाठी कष्टलो । तव भजनी तुष्टलो
द्वारी मुझीया तिष्टलो । सुरवरबंधना
ऐकले विघ्ने हरशी । जाळशी रे पापराशी
अपराध विसरशी । एकदंता
मोकलूनी मी त्वरेने । धाव घेतली वेगाने
आलो बहुत आशेने । मोदकप्रिया
प्राथावे रे जीवाभावे । किती किती विनवावे
किती रे तुला स्तवावे । प्रथमेशा
अवघ्या अवनीवरी । जो सर्वथा राज्य करी
का न माझे दुःखहरी । अष्टविनायका
पाझर नये म्हणूनी । जावे कारे परतुनी
थकलो रे आळवुनी । परशुधरा
प्रसन्न कसा रे होशिल । आपत्तीत तारशील
दया कधी करशील । प्रसन्नवदना
विनम्रे विनवी प्रभा । उजवी अंधरीनभा
राही पाठीमागे उभा । विघ्ननाशका
अंगारकी संकष्टी रोजी , माझ्या वडीलांनी केलेली ही श्री गजाननाची आळवणी.

No comments: