Monday, June 25, 2007

मै और मेरी तनहाई


वर्षाऋतुतील हे असे मदहोशी, धुंदफुंद वातावरण. या बेहोशीच्या माहोल मधे, कुणाला हवी असते सुरांची नशा तर कुणाला सुरेची. एक गहन प्रश्न मला सतवत आहे. लता की नुरज़हान ? धरतीने हिरवाकंच शालु परीधान केलेला, समोरील सिंहगड ढगात हरवलेला, धुक्याची शाल पांघरलेला. नशीली हवा, बोचरे वारे, काली घटा छाये मोरा जीया तरसाये. बैचेन मी, सोबतीला लता व नुरज़हान.

लतानी आपल्या दर्दभऱ्या आवाजात गायला सुरवात केली. अर्थात कॅसेटवर.
किस्मतमे खुशी का नाम नही, काली काली रात रे दिल बडा सताये तेरी याद आये, वो रात दिन वो, आज मेरे नशीब ने मुझको रुला रुला दिया ( सैंया - संगीत सज्जाद हुसेन ) सपना बन साजन आये ( शोखीयां- जमाल सेन ) साजन तुमसे प्यार करू ( बदनाम - बंसंत प्रकाश ) , जावोगे ठेस लगाके बहोत पछतावोगे बालम ( ( फरेब - अनील विश्वास ), टुटेगी ना प्यार की डोर ( अंबर - गुलाम मोहंमद) साजन से पहली बार मिले तो बोले कैसे ( रिस्ता के.दत्त्ता) ,जोगन बन आई हुं सैय्या तोरे कारण ( शबाब नौशाद ) टुटे हुवे अरमांनो की दुनीयां बसाये ( लाहोर - श्यामसुंदर).

बस्स. किती म्हणुन काळीज पिळवटुन घ्यायचे ?

मग बारी आली नुरज़हानची. सुरवातीलाच तीने चक्क ब्रह्मास्त्र काढले.

बदनाम मुहब्बत कौन करे और इश्कको रुसवा कौन करे ।
जब दे दिया दिल ही आपको , फिर आपसे शिकवा कौन करे ॥
आख़ोमे समाये जब तुम हो और दिल मे समाये जब तुम हो ।
फिर तुमही बतादो आके जरा दुनीया की तमन्ना कौन करे ॥
आसुतो पिये मुश्कील मगर इतना भी बतादो आकर ।
जो आग लगी है सीने मे वो आग को ठंडा कौन करे ॥ ( दोस्त - श्याम सुंदर)

फैसला येथेच झाला.

No comments: