Sunday, June 10, 2007

खेडयाकडे चला, खेडी स्वयंपुर्ण व्हायला हवीत.

"खेडयाकडे चला" "खेडी स्वयंपुर्ण व्हायला हवीत" ही महात्मा गांधींजींची शिकवण प्रत्यक्षात आचरणात आणणाऱ्या चित्रपट तारे-तारकांना माझा हिरवा सलाम. यांचे अनुकरण वास्तवीक पहाता सर्वांनी करायला हवे. आज आपल्यापुढे एक आदर्श घातला गेला आहे. गावाकडे परत जा, शेती करा, शहरांवर पडलेला भार कमी करा, आपला देश शेतीप्रधान आहे याचा विसर पडुन देवु नका हे सारे संदेश या कृतीतुन दिले गेलेले आहेत. आता काहीच्या पोटात दुखत असावे त्याला ईलाज नाही, वागणुकीचा विपर्यास करणारी माणसे काही कमी नसतात.

कदाचीत हे सारे मुळचे व्यवसायाने किसान असावेत , राह भटकले असावेत म्हणा किंवा पोटापाण्यासाठी या मोहमायी दुनियेत आले असावे पण त्यात त्यांचे मन रमलेले नसल्यामुळे ते आपल्या मुळच्या व्यवसायाकडे वळले असावे. मला समजत नाही यात गहजब उडावा असे काय आहे ? ह्याच शुद्ध व प्रामाणिक हेतुने दिलीपकुमार, अमिताभजी, धर्मेन्द्र, सुनिल शेट्टी, संगीता बिजलानीपासुन अमीर खान (लगान फेम) पर्यंत सर्वांनाच मावळाची भुरळ पडत असावी.
या प्रेसवाल्यांना कही कामधंदे नाहीत का?
उगाचाच "खासगी वनांच्या नोंदिमुळे धनिक आगीतुन फुफाट्यात" " अमिताभ पाठोपाठ धर्मेन्द्र ही अडचणीत " आदी ठळक बातम्या छापत असतात.

1 comment:

दिनेश पाटील said...

खुप छान !! याचे अनुकरण करायचा प्रयन्त आम्ही नक्की करु !!

Thanks,
Wings of will Group, Barshi
DreamIndia2020