Monday, May 25, 2009

जेव्हा लक्षाप्रमाणेच त्या कड़े पोचण्याचा प्रवास मस्त असतो तेव्हा .









दिवेआगाराला जातांना राजाभाऊ सरळ वाट कधीच धरत नाहीत।


मुंबई वरुन रेवस किंवा मांडव्याला लॉन्चनी जायचे , रमतगमत, मग कधी आवास , सासवाने बघत अलीबाग - आक्सी , नागाव करत हळुवार पणे चौल, रेवदंडाच्या नयनरम्य नारळीफोफळीच्या बागांचा आस्वाद घेत , रेवदंडा - काशीद -मुरुडच्या , एका बाजुला समुद्र ठेवत वळणावळणानी सरकत जाणारया रस्ताच्या मोहात पडत , बेभान होत , मुरुड ते दिघी लॉन्चनी प्रवास करत व एकदाचे का बोर्लीला पोचले की सुटकेचा निश्वास टाकत दरमजल करत दिवेआगाराला पोचणे हा त्यांच्या स्वभाव झाला आहे।


त्यांच्या बरोबर त्यांच्या बायको-मुलाची फरफट आणि परवाला तर त्यांच्या भाच्याची देखील, आपल्या मामाचा आटा सटक आहे हे जाणुन असून देखील त्याचा हा विक्क्षिप्तपणा नव्याने जाणुन घेत।


पण दिवेआगाराला समुद्रात दुबक्या मारतांना त्याने कदाचीत मामाचा हा वेडेपणा खपवुन घेतला असावा ।

4 comments:

रोहन... said...

कोकणा मधला असा प्रवास म्हणजे नितांत आनंद आणि अविस्मर्णीय अनुभव याची पर्वणीच ... :)
मी स्वतः असा प्रवास बाईकने करतो. खुप मज्जा येते.

HAREKRISHNAJI said...

Dear Rohan,

I have also travelled a lot on my Yamaha Rx100

bhaanasa said...

इथे येण्याआधी वर्षातून तिनचार वेळा तरी कोकणवारी असेच. देवरूखाजवळ घर-शेतीवाडी असल्याने जाणे होतेच. सुमोने/ट्रेनने कसेही जा कोकणप्रवासाचा आनंद अवर्णनीयच असतो.अजूनही कितीही थोड्या दिवसांसाठी आलो मायदेशी तरी लागलीच दोन दिवस तरी जातोच.
तुम्ही दिलेले शिर्षक भावले. असेही तुमचे लिखाण व मांडणी मला नेहमीच आवडते.

HAREKRISHNAJI said...

Bhaansa

Thanks. entire kokan region is so beautiful , speciaaly after monsoon. I ahve to travel a lot in this region. I had been to Devrukh once, I know somebody in Devrukh