नवराबायकोचे ३६ पैकी ३६ गुण जमायला पाहिजेत ही गोष्ट खरी पण निदान अंगीभुत काही गुण जुळले तरी पुष्कळ . आणि मग दोघांची मते जुळायला पाहिजेत असे कुठे आहे ?
चल, तयार हो, जायचय म्हटल्यावर दुसऱ्या मिनिटाला तयार होवुन पाचव्या मिनिटाला खाली उतरणारी बायको.
खरं तर आजची फर्माईस फर्माईश तिचीच माटुंग्याल राम आश्रय मधे, "कोकोनट शेवया " खायला जाण्याची. राजाभाऊंना मुत्तुस्वामी मधे इडीआप्पम व कोकोनट स्टु खाण्याची आज इच्छा होती. बायकोच्या पु्ढे नवऱ्याचे कधी काय चालले आहे का ? राम आश्रय म्हणजे राम आश्रय, अपिल नाही.
त्यांनी राम आश्रय मधे गेल्यानंतर आपल्या इच्छेला मुरड घालायचे ठरवले कारण ही तसेच होते. समोर त्यांनी पाटी वर पोंगल अवियल लिहिलेले वाचले. मग त्यांनी पोंगल अवीयल मागवले. पण एक गडबड झाली. अवीयल वेगळॆ खुप लहानश्या वाटीत थोडॆसेच दिले त्यानी त्यांचे काय समाधान व्हायचे ? आणखीन एक वाटी मागवले ते ही कमी पडले. पोट काही भरले नाही.
मग ते आर्यभवनमधे इडीआप्पम खायला गेले. पण एवढ्या सक्काळी सक्काळी साडॆ सात वाजता त्यांना ते कसे मिळावे ? मग काहीसे खट्टू होवुन ते काफे म्हैसुर मधे रवा डोसा खायला गेले.
No comments:
Post a Comment