Tuesday, April 27, 2010

महाराष्ट्र माझा - खाद्य महोत्सव - मनसे आयोजीत
राजाभाऊ आता मागे परतणे नाही. मागचे सारे दोर कापुन टाकले आहेत. आज जगातील कोणतीही ताकद, शक्‍ती तुम्हाला शहाजीराजे क्रिडा संकुलात खाद्यमहोत्सवात जाण्यापासुन परावृत्त करु शकत नाही. तुम्ही साऱ्या प्रतिकुल परिस्थितीशी लढा. भेदा हा चक्रव्युह. चला, व्हा पुढे, चालत रहा.  ब्लॉगर्सची  सारी सेना ऐन मोक्याची क्षणी गायब झाली म्हणुन काय झाले ? एकला चलो रे.

बचेंगे तो और खायेंगे.

अंधेरीच्या महाभयानक गर्दीतुन, ट्रॅफिक जॅम मधुन कधी बस मधुन, कधी रिक्षामधुन कधी चक्क चालत चालत, मार्गक्रमण करत ते आपल्या इच्छीत स्थळी अखेरीस पोचले.

आत शिरताशिरता समोर आले ते  लेझिम पथकानी सादर केलेले लेझिम, मग तुतारी वादन, कडकडणारी  हलगी माहोल कसा मस्त बनु राहिली होता. सारे क्रिडांगण छान सजवले आहे, बसुन खायला खुप टॆबलखुर्च्या मांडल्या आहेत. विभागावारी स्टॉल लावुन त्याच्यामागे त्याप्रमाणॆ सजावट करण्याची कल्पकता जबरदस्त.

काल सुगरीणींची खाद्यस्पर्धा होती.  त्यांनी कायकाय केले आहे ते बघायला जायला  हवे होते.

तर  
कोकणातल्या ओल्याकाजुची उसळ खाण्यासाठी त्यांची बायको इतके दिवस तळमळुन राहिली होती, तिची ही इच्छा आज पुरी झाली, परंतु खरचं ही इच्छा पुर्ण झाली का की राजाभाऊंनीच त्या उसळीवर डल्ला मारल्यामुळॆ ती अतॄप्तच राहिली ? त्यात उसळीसोबत गरमागरम वडॆ.

राजांभाऊंनी त्यांना म्हटले की जरा माणसाची साईझ बघा आणि मग वाटीत भाजी भरा, मग अगदी सढळ हस्ते त्या चिपळुनवरुन आलेल्या गृहस्थांनी राजभाऊंना ओल्या काजुची उसळ खाऊ घातली.

तेवढ्यात त्यांचे लक्ष कोल्हापुरी मिसळीकडॆ गेले. गेल्या वेळी शिवाजी पार्कावर आयोजीत कोल्हापुर महोत्सवात ती खाण्याची राहुन गेली होती. मग कोल्हापुरी मिसळ आणि सोबत दोनच फक्त दोनच कांदा भजी. उगीच जास्त नको. अजुन लांबचा पल्ला गाठायचा आहे.

हं. नागपुरकर काय म्हणतात ? आपल्याला हे काय खिलवुन राहिले आहेत ? विष्णु मनोहरांनी काय येथे डाव मांडला ? पाटवड्याचा रस्सा आणि सोबत मांडॆ आणि गोळाभात देखिल.

हवा तो आंबा निवडा, आमरस काढुन मिळेले. मग लागलेली तहान भागवण्यासाठी हवा तो आमरस.

आता बास की , थोडे पदार्थ उद्यासाठी राखुन ठेवाल का नाही म्हणता म्हणता राजाभाऊंची नजर डालबाफल्यांकडॆ गेली आणि मग ते मनाने तत्काळ इन्दोरला पोचले.

कशाला, कशाला बोलताबोलता मग राजाभाऊंनी डालबाफल्यांवर आडवा हात मारला.

पुरे आता, त्यांची बायको त्यांना ओरडली, मग त्यांनी आवरते घेतले.

3 comments:

महेंद्र said...

जमवायचंय, बायको म्हणते , पंधरा दिवसापासूनच्या डायटींगची वाट लावायची आहे का एका दिवसात? तरीपण जाउन येईनच बहुतेक आज - उद्या कडे.

Ugich Konitari said...

ब्लॉग मधून निरनिराळ्या पदार्थांचे वास आले असते तर किती छान झालं असतं !

canvas said...

मी काल जाता जाता राहिलो. आज आता जायचच काहि झाल तरी.