Saturday, March 20, 2010

होतं असं कधीकधी


समुद्र. मिलिंद बोकीलांची कादंबरी.

मुंबईमधली लोकल ट्रेन. भरगच्च गर्दीत घामटलेल्या सकाळी वाचायला घेतलेली.
पहिले पान. पहिला परिच्छेद, पहिला शब्द. मनाची पकड घेवुन राहिलेला. प्रत्येक शब्दनीशब्दाची आपण भरभरुन मजा घेत राहिलेलो.

सभोवतालचा विसर पडलेला, मन वाचनात मग्न.

प्रवास संपला इच्छीत स्थानक आलेलं. पुस्तक अर्धवट वाचुन राहिलेले.

आता रात्री घरी आरामात , शांतपणे, मनोसोक्त उरलेली कादंबरी मनात उतरावायची.
पण नाही. रात्री तुम्ही घरी परतता. मन काही केल्या पुस्तकात रमत नाही. काहीच वाचुन होत नाही

No comments: