Saturday, March 20, 2010

होतं असं कधीकधी.


अंधेरी रेल्वेस्थानक. 

फलाटांवर विरुद्ध बाजुला जाणाऱ्या दोन्ही ट्रेन एकदम आलेल्या. पादचारी पुलावर महाप्रचंड गर्दी. पुलाच्या जवळ जाणे देखिल महामुश्कील. कसेबसे तुम्ही त्या लोंढ्याबरोबर बाहेर पडता. बाहेर रस्तावर आकाश मार्गाचे काम रेंगाळत चाललेले. त्यात रस्तावरुन गटारगंगा मुक्तहस्ते वाहत राहिलेली.

नेहमीप्रमाणेच रिक्षावाल्यांनी तुम्हाला घेवुन जायला नकार दिलेला.

तुम्ही नकारांना कंटाळता. रणरणत्या उन्हात, तप्त सुर्याचा दाह सहन करत, घामाच्या धारा वहावत , तुंबलेल्या प्रचंड वहातुकीतुन रस्ता काढत आपल्या इच्छीत स्थळी पोचता. 

विलेपार्ले स्थानक.

अंधेरीच्या महाप्रचंड गर्दीशी तुलना करता एकदम आरामदायी जागा.

आरामात तुम्ही पुलावरुन बाहेर येता. रस्तावर पाऊल ठेवतानठेवता, कोणीतरी तुम्हाला हाका मारत राहिलेले. तुम्हाला फक्त आयते जाऊन त्या गाडीत बसायचयं.

No comments: