सिंहगड रस्तावर आतापर्यंत चांगले डोसे, उत्तपे आदी खायला मिळण्याबाबत दुष्काळच होता पण तीन आठवड्यापुर्वी सुरु झालेल्या " मानकर डोसा" नी तो संपवला अस म्हणायला हरकत नाही.

रात्री राजाभाऊंना तेथे पोचायला उशीर झाला , दुकान बंद झाले, मग ते समोरील "गिरीजा" मधे झुणकाभाकर खायला गेले.
पण काही गोष्टींशी तुमचे नाते नाही जुळत. मागे दोनदा न खाता उठुन जायला लागले होते, एकदा त्यांनी आम्हाला कारणाशिवाय बसल्याजागेवरुन ऊठायला लावले होते व वाईटातल्या वाईट जागी बसायला सांगीतले, दुसऱ्यांदा मुद्दामुन पाहुण्यांना घेवुन गेलो असता, नेमके त्याच वेळी सर्वत्र घुपाची उदबत्ती जाळलेली, ती पाहुण्यांच्या पचनी पडली नाही, या वेळी नेमका झुणाका मरणाचा तिखट, घाईघाईत दुकान बंद होण्याच्या वेळीस बनवलेला, त्यात मिरचीचा ठेचा चुकुन दोनदा टाकलेला.
पण फोडणीचे वरण व भात मात्र चांगला मिळाला.
No comments:
Post a Comment