Thursday, July 02, 2009

सखियां झुलन चली रे फुलबागीयांन | घीर आई कारी कारी बदरीया ||

नेहरु सेंटर आयोजीत "मेघ मल्हार " ला जातांना छत्री न घेता जाणे व वाटेत पावसानी भिजवले तर दोष पावसाचा नाही, संयोजकांचा नाही, कलाकारांचा तर नाहीच नाही आणि "मल्हार " रागांचा तर अजीबात नाही. असलाच तर तो राजाभाऊंचाच आहे.

एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नसेल , ती होवुन गेलेली असेल. तुम्ही ती घडत असतांना त्या स्थळी उशीरा पोहोचता आणि तुमच्या हाती फारसे काही लागलेले नसते.

पण
पण तरी देखील ती अकस्मात तुमच्या वाट्याला येते. जे हुकले आहे ते मिळते.
हे गौंड्बंगाल काय आहे ?
मुंबईच्या संथगती वाहणाऱ्या वाहतुकीने चर्चगेट ते वरळी जवळजवळ दिड - पावणे दोन तास घेतले. मीता पंडीत गात असलेला सुरदासी मल्हार संपत आला होता. हाती लागली ती कजरी आणि टप्पा.

कार्यक्रम संपला. आता प्रतिक्षा होती ज्यांचे गाणे ऐकण्यासाठी हा जो हट्टाहास केला त्या जयतीर्थ मेवुडींच्या गाण्याची.
आणि अचानक मीता पंडितांचे गाणे पहिल्या पासुन सुरु झाले. गौड मल्हार ची विलंबीत बंदीश.
का पण का ?

No comments: