माननीय शिक्षणमंत्री श्री. रामकृष्ण विखे-पाटीलजी,
सप्रेम नमस्कार,
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचे कबुल करण्यात आपण प्रामाणीकपणा दाखवला, बरे वाटले.
आता जरा लक्ष प्राध्यापकांच्या संपात घातलेत तर फार बरं होईल. मुलगा बरेच दिवस झाले घरी बसुन आहे. ( नाही तरी एरवी महाविद्यालयात जरी जात असला तरी तो लेक्चरना बसत असेलच असे नाही तरी पण).
गेल्या वर्षी अभ्यासक्रम बदललात, पाठ्यपुस्तके महाविद्यालय सुरु झाल्यानंतर त्यानुसार दोन-चार महिन्याने प्रकाशीत झाली. आम्ही काय म्हटल का ? आमच्यापेक्षा तुम्हालाच त्यांची काळजी असावी हे जाणुन गप्प बसलो ना.
पण आता तरी त्यांच्यासाठी सारे सुरळीत व्हावे हो, तेव्हा जरा त्यांच्या कडेपण लक्ष द्या.
2 comments:
हे मंत्री कसले खादाड लोक बसले आहेत. महाराष्ट्रात शिक्षणाचा पूर्ण बोर्या वाजवला आहे या लोकांनी. प्रत्येकाची एक शिक्षण संस्था आहे (आपण याला शिक्षणाचे दुकान म्हणुया आपल्या सोयीकरिता) ज्यात जुलै ऑगस्ट महिन्यात हा बाजार तेजीत असतो. या बाजारात यांच पोट कधिच भरत नाही व बाजार मंदावला की राजकारणाचा बाजार आहेच. ज्यात यांनी लोकांना मुर्ख बनवून आपली पोळी भाजणे हे एकच काम ठेवले आहे.
या शासनाला विद्यार्थ्यांची किंवा शिक्षणाची काळजी असती तर हा संप कधिच संपला असता.
प्राध्यापकांनी हा संप यशस्वी केला यात त्यांच अभिनण्दनच करायला हव. थोड तुप त्यांनाही ओढू द्या त्यांच्या पोळीवर.
का त्यांनीच फक्त त्याग करायचा ?
Thanks for sharing the sentiments
Post a Comment