Sunday, March 18, 2007

The Great Indian Cricket Comedy Show

आये थे बडे अरमान लिये सीनेमे कई तुफान लिये।
अ़जाम ये है सीनेमे एक गम की कहा़नी लेके चले॥
(लोकसत्ता मधला फोटो)

आई त्यानी मला मारले व बघना वर कसा फिदीफिदी हसतोय मेला. आता मी काय करु आई सांगना.
चले जाव.


(फोटो दै. सकाळ मधुन )
मुंगी ने मेरुपर्वत चक्क गिळला भारत बांगलादेशाबरोबर पहिल्याच क्रिकेट सामन्यात सपशेल हरला.
ये क्या हुवा कैसे हुवा क्यु हुवा ये ना पुछो. पुरते वस्त्रहरण जाहले म्हणायचे की हो, ह्या लाजिरवाण्या पराभवानंतर. वर म्हणुपण शकत नाही बचेगें तो औरभी लडंगे.
मी काय म्हणतो, आपले रथी महारथी असे गलितगात्र का बरे होत आहेत. चॅपल गुरुजीचा ऊपदेश असा का बरे विफल का झाला ? हे सर्व अतिलाड व फाजिल आत्मविश्वासाचे परीणाम तर नसावे ? एकुणच ह्या देशात क्रिकेट आणि क्रिकेटीयर ह्याचे प्रमाणाबाहेर महत्व फुगवले गेलेले आहे त्याचीच ही परीणीति नसावी ना ?
एक मरे त्याचा दुजा शोक वाहे. किती किती आणि केव्हा केव्हा हरण्याचा शोक मनवायचा ? सवय तर झाली होतीच पण म्हणुन काय बांगलादेशाबरोबर ? त्यातल्या त्यात समाधानाची बाब. पाकिस्तानला आयलॅंड हरवले व त्याचा संघ स्पधेबाहेर गेला.

मेरा भारत महान. हारो इंडिया हारो.

No comments: