घाटमाथ्यावरुन, लोणावला परिसरातुन खाली कोकणात ऊतरणाऱ्या अनेक वाटा आहेत. विषेशताः तैलबैला कडुन. भांबुर्डे गावातुन सुसाळे बेटावर जाताना ह्यातल्या दोन वाटा श्री. सुरेश पराजंपेनी पुढच्या वेळेसाठी राखुन ठेवल्या होत्या, त्यातली एक अंधारबनातुन खाली ऊतरणारी. येथल्या घनदाट जंगलात दिवसापण काळोख असतो म्हणुन त्याचे नाव अंधारवन. येथे मात्र मला जाण्याचा योग आला नाही. दुसरी वाट धनगडाला वळसा घालुन, केवणीच्या पठारावरुन, सुधागड उजवी कडे ठेवत खाली पाच्छापुरच्या वाडी वर उतरणारी.
नेहमी प्रमाणे दुपारची १२ च्या सुमारास लोणावळ्यावरुन सुटणारी भांबुर्डे गावाला जाणारी राज्य परिवाहनची बस पकडुन भांबुर्डेला पोहोचला श्री व सौ सुरेशजी, श्री. तवसाळकर व मी असा चार जणांचा कंपु. देवळात भोजन उरकुन पायपिटीस सुरु केले. रमत गमत, पठारा वरुन मजेत चालत रहाण्यासारखे दुसरे सुख नसावे, वाटेत रानमेवा ,करवंदे आमची वाटच पहात होते दोनहस्ते नव्हे मुक्तहस्ते वेचत, करवंदांच्या काटेरी जाळीत घुसत, जखमी होत करवंदे खाण्यात मजा काही और होती.
घोडेजीन वर उतण्यापुर्वी क्षणभर विश्रांती घेवुन ती पार कराताना बहार आली. पठारावरुन मजलदरमजल करीत सांजेला पोहोचलो किणवी गावात, गवळीपाडयात. राम राम करीत दयाळु गावकऱ्याकडे त्यांचा अंगणात पथारी पसरण्याची परण्याची परवानगी घेतली.
शेणाने स्वच्छ सारवलेल्या अंगणात मुक्काम, जवळच छोटिशी देवरायी, त्यात परत पौर्णिमेची रात्र, तिप्पुर चांदण्यात धरती नाहुन निघालेली, पुर्ण चंद्रमा गगन बिराजे, ( चांदनी रात मुहब्बतमे हसी थी फाकीर ), गप्पागोष्टी करत रात्र केव्हा सरली कळलेच नाही.
सकाळी दयावंत होत आमच्या यजमानानी धारोष्ण दुधाची करंडी न्याहारी करताना आणुन दिली. आनंदाची हि तर परिसीमा. परत ह्या गावातुन दोन तीन वाटा खाली उतरतात. आमच्या नेताजींनी सोपी अशी (खास माझ्यासाठी ) नळीची (म्हणजे दोन डोंगराच्या खाचे मधली) वाट निवडली.
तैलबैलाच्या दिसण्याऱ्या अजस्त्र भिंति आता मागे पडत चालल्या होत्या येथुन पुढे चालताना दिसु लागला तो सुधागड आणि खालच्या पसरलेल्या दऱ्यांचे विहगंम द्रुश्य. पठारावरुन खाली दरीत उतरताना व परत वर चढताना जाणवु लागला चैत्रातला ऊन्ह्याचा तडाखा. धरती, आजुबाजुचे खडक मस्तपैकी स्वताः तर तापले होतेच पण आम्हालाही दाह देत होते.
त्यात माझ्या नविन बुटानेही चाव चाव चावायला सुरवात केली. पाण्याचा मारा करीत, लिम्बु सरबतावर ताव मारित रडत रखडत कसेबसे, दगा दिलेल्या पायानी आणि शारीरिक दमवणुकिने बेजार होत पाच्छापुरच्या वाडी पर्यंत मी अखेरीस पोहोचलो पुन्हा परत कधीही पदभ्रमणाला न जाण्याचा निश्च्यय करीत.

येतुन मग गणपती पालीला जाण्यासाठि S.T.Bus मिळाली, पालीला पोहोचलो , जीवात जीव आला.
No comments:
Post a Comment