परमेश्वर करो आणि अशी मेहुणी मला सातजन्म मिळो. आज तिने (उदार होत ) माझ्यासाठी, मला आवडते म्हणुन घरी बनवलेले शुद्ध रवाळ तुप , आब्यांचा मोरंबा आणि माझ्या बायकोसाठी फणसाची भाजी पाठवली ते पण चक्क माझे साडु मालाड वरुन घेउन आले. ( माझी मोठी मेहुणी. काश धाकटी असती तर ?)
वरती मी तीला खवचटपणे "तुपाचा वास फार चांगला येतो आता खाल्ल्यावर बघु कसे लागते ते " असे ऐकवले. (so mean of me)
Photos to be uploaded.
वरती मी तीला खवचटपणे "तुपाचा वास फार चांगला येतो आता खाल्ल्यावर बघु कसे लागते ते " असे ऐकवले. (so mean of me)
Photos to be uploaded.
4 comments:
हरेकृष्णजी आज तुमच्या देखण्या, चवदार ब्लॉगला भेट दिल्यावर दिल खुष झालं. सही टाकली आहेत सगळी चित्रं. पुरणपोळी, मोतीचूर, जिलबी, ओल्या काजूची उसळ, फ़णसाची भाजी, मिसळ, पावभाजी, गेलॉर्ड्सचे केक्स.. wow!! आत्तच्या आत्ता मुंबईला यावसं वाटायला लागलय हे पाहून. प्रकाश दुग्ध मंदिरमधला तो हाणणारा गणप्या सही टिपला आहे. इतर पोस्ट्स सुद्धा अगदी समर्पक आहेत. तुमची खाद्यरसिक आणि जीवनाचा आनंद छोट्या छोट्या गोष्टींमधून टिपत रहाण्याची संवेदनशील दॄष्टी जाणवते.
लिहित रहा. तुमच्या कॅमेराच्या लेन्समधे मुंबईमधले असे अनेक चविष्ट, रंगतदार क्षण टिपत रहा. इथे टाकलेत की आम्हालाही त्यांत सहभागी झाल्याचा आनंद मिळत राहील.
TULIP,
स्तुति कशी करावी हे आपल्याकडुन शिकावे.
माझ्या आनंदात सहभागी झाल्याबद्द्ल धन्यवाद.
Va bavu tevdha kautuk tari karava neet mehunicha! Kidding but family really does so much. Pratekachya aavdhi lakshat thevne is not an easy job.
Anjali,
केलय, केलय हो खुप कौतुक त्यांचे. मेहुणीला असे बोचकारे काडले की कसे बरे वाटते.
Post a Comment