Wednesday, June 18, 2008

विक्रम और वेताळ आणि वटपौर्णीमा

आजच्या एकाच दिवशी विक्रम सहसा वॄक्षावर चढुन वेताळाला खाली उतरवण्याच्या भानगडीत सहसा पडत नाही. उंच जागी, झाडाच्या सर्वात वरच्या फांदीवर भेदारलेला फांदीग्रस्तपिडीत वेताळ जावुन लटकत असतो. येवढ्या वर वॄक्षावर चढण्याचे कष्ट विक्रमाला करण्याचे जीवावर येते. आणि त्यात परत आपले घर रहाते की जाते या चिंतेने ग्रासलेला वेताळ बोलण्याचा, प्रश्न विचारण्याच्या मनस्थीतीत नसतो.
तेव्हा आज मीच वेताळाच्या ऐवजी प्रश्न विचारतो.


आजच्या दिवशीच वेताळाला झाडाच्या सर्वात वरच्या फांदीवर आपले बस्तान का बरं हलवायला लागते ?


माझ्या प्रश्न्नाचे उत्तर द्या ......

3 comments:

मन कस्तुरी रे.. said...

कारण अमर्याद तरुतोडीने, विशेषतः आज वडाच्या फांद्या वाटेल तशा ओरबाडल्याने वेताळाला भिती वाटते.

जो वृक्ष एव्हढा मनोभावे पुजायचा तर त्याच्याच पारंब्या अशा तोडून टाकून काय साधतं?

HAREKRISHNAJI said...

अश्विनी,

होना आपल्याला निसर्गाकडे जायला फुरसद नाही मग तो हवा तसा ओरबाडुन घरी आणा कशासाठी तर त्याची पुजा करायला

sonal m m said...

'जान बची लाखो पाये, लौट के ...' वेताळ भूत असेल हो, पण ह्‍या कली युगातल्‍या माणसां पासून कोण वाचवणार त्‍याला !!
म्‍हणतात ना झोपेचं सोंग घेतलेल्‍याला कसं उठवणार !!!