Friday, June 20, 2008

हल्ला

आपल्या संपादकांच्या घरावर जवळजवळ महिनापुर्वी झालेल्या हल्लाचे प्रकरण लोकसत्ता अजुनही धरुन ठेवुन रोजच्या रोज खिंड लढवतोय.

दररोज या संबधीच्या बातम्यांनी, निषेधांनी, वाचकांच्या पत्रांनी वर्तमानपत्रात पाने भरभरुन छापुन येतयं.
अजुन किती दिवस तेच तेच आम्ही वाचकांनी वाचत रहाव म्हणतोय मी ?

दुसर एक हल्ला. देशावरचा.

आपल्या मागण्यांकरता समाजातील काही घटक आंदोलन करतात, चागलेच हिंसक. ४३ जणांचे प्राण घेणारे आणि अज्बावधी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान करुन आपल्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळवण्यासाठी. राज्यातील प्रमुख महामार्ग, रेल्वेमार्ग त्यांनी कित्येक दिवस रोखुन धरले. हिंसक चकमकी केल्या .

विरोधाभास असा की या हिंसक आंदोलनाचा निषेध करण्यापेक्षा संपादकांच्या घरावर मुठभर लोकांनी केलेल्या हल्लाला जास्त महत्व.

अर्थात दोन्ही घटना वाईटच. पण .....

1 comment:

Anonymous said...

ह्या सगळ्या निषेधार्ह घटना आहेत. मी काल लिहिलेल्या राष्ट्रवाद लेखातही या घटनांचा निषेध केला आहे.स्वतःच्या हातांनी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करताना यांना काहीच वाटत नाही का?

बाकी लेख उत्तम.असेच लिहीत चला.