Thursday, February 17, 2011

शाकाहारी

दिलेला शब्द हा चुकुन  कधीतरी पाळण्यासाठी असु शकतो असे राजाभाऊंचे मत . पण तो शब्द जर का भोजनाशी निगडीत असेल तर मात्र शेंबी तुटो वा पारंबी तो पाळलाच गेला पाहिजे असे त्यांचे मात्र प्रामाणीक मत.  

गेल्या वेळी मॅरीयट्स मधल्या स्पाईस किचन मधे त्यांच्या बायकोला  डेजर्टस खायला मिळाले नव्हते. त्यात असलेल्या अंड्‍यानी घात केला.  राजाभाऊंचा जीव हळहळला. खाण्याच्या बाबतीत विक पॉईंट असल्यामुळे राजाभाऊंना ते मनाला लागुन राहिले आणि त्यांनी तेथल्या तिथे आता तुझ्या वाढदिवसाला  आपण मॅरीयटस मधल्या "शाकाहारी " मधे जेवायला जावु असे जाहीर केले.     

तिचा वाढदिवस आला, व्हॅलेंटाईन डे पण अगदी जवळ आलेला. राजाभाऊंच मन पालटले . त्यांनी रात्री, चांदण्या रात्री, मोकळ्या हवेत, थंड गार वारे अंगावर घेत , मस्त पैकी बॅंड ऐकत थोडासा रुमानी होत जेवणास जाण्याचे ठरवले. सयाजीचा त्यांना निरोप आलेलाच, तरणातलावाजवळ  नविन रेस्टॉंरंट सुरु झाले आहे , तेव्हा यावे. 

ते तिथे गेले.  पण त्यांच्या नशिबी त्या रात्री तेथे जेवण होणे नव्हते.  अन्नासाठी फिरफीर फिरणे लिहीलेले. दारु , सिगरेटचा वास आसमांत भरुन राहीलेला, तेथुन ते उठले  मग त्यांच्याच "पोर्टीको"  मधे असलेल्या खुप गर्दीला कंटाळुन हिंजवडीतल्या कोर्टयार्ड मॅरीयट्स मधे गेले. ( पुर्वी त्यांनी राजाभाऊंना ५० % सवलतीची कुपने दिली होती, परमेश्वर त्यांची भरभराट करो ).  तेथेही जेवण त्यांच्या नशिबी नव्हते. दक्षिण महोत्सव चाललेला. परत मास मटन मच्छी.  चेट्टीनाड.  नको.

ह्या साऱ्या भानगडीत रात्रीचे अकरा वाजायला आलेले. आता दिलेला शब्द त्यांनी पाळायचे ठरवेल व ते "शाकाहारी ? मधे जेवायला गेले. ( ह्याची माहिती त्यांना श्री. शंतनु घोषच्या ब्लॉगवर मिळालेली http://www.shantanughosh.com/2010/12/going-shakahari-in-style.html ) .

शुद्ध शाकाहारी. भारतीय पद्धतीचे किंवा पॅन एशियन. सेट मेन्यु. चारापैकी तीन भाज्या निवडा, दोन डाळी पैकी एक, सुप, सॅलडस, तवा फ्रायचे पदार्थ वगैरे, आणि शुद्ध शाकाहारी डेझर्ट्स.  चक्क वेगळ्या खोलीमधे मांडलेले. किती खावु नी किती नाही. हे खावु का ते ? 

त्या दिवशी राजस्थानी पद्धतीची भाज्या होत्या, व २४ तास शिजत ठेवलेली डाळ. 

सर्वात आवडलेला प्रकार म्हणजे "बदाम हलवा " गाजर हलवा, दुधी हलवा खाल्ला होता पण चक्क बदामांचा हलवा ? 

घरी पोचायला खुप खुप उशीर झाला. सुस्तावल्या अवस्थेत , अर्ध्या झोपेत , गाडी चालवणे अंगावर आलेल्या स्थितीत ते कसे बसे घरी पोचले. आता दिलेला शब्द पाळायचा म्हणजे त्याची किंमत दिलीच पाहीजे. 

No comments: