Sunday, February 20, 2011

ट्रेकर्स डायरी. श्री. रोहन चौधरी. पुणे टाईम्स. दर शनिवार.

ट्रेकर्स डायरी. श्री. रोहन चौधरी. पुणे टाईम्स. दर शनिवार. 

पुन्हा जुन्या सुखद , आनंदमयी आठवणी जाग्या करुन राहिल्यात. 

जी.ए. म्हणतात तसे , फक्त भुते आणि आठवणींना उलटे पाय असतात.

रोहन, समस्त ब्लॉगधारकांचे लाडके, भन्नाट  व्यक्‍तीमत्व. आता तर त्यानी म.टा. द्वारे साऱ्यांचे मन काबीज केले  , ट्रेकर्स डायरी मधुन.

किल्ले रायगड. किल्लांचा किल्ला. बुलंद गड.  शिवप्रेमी मराठी माणसांचे सर्वात मोठे पवित्र तिर्थक्षेत्र. रायगड, ज्याच्या नुसत्या नामोच्चरानी मान आदराने खाली झुकते, लवते ती मनोमनी त्या रायगडाला, स्वराज्याच्या राजधानीला आणि शिवरायांना प्रणाम कराया, मानाचा मुजरा करायला. 

"प्रदक्षिणा किल्ले रायगडची " वाचतांना मन दुसऱ्याच क्षणी वाऱ्यावर मांड ठोकत, स्वार होवुन महागतीने रायगडावर जावुन पोचले, त्वरीत कळ दाबुन भुतकाळात गेले, आणि मग ती चिंचोळी वाट दिसु लागली, वाघोली खिंडीत झालेली दमछाक आठवु लागली. पण त्या श्रमात ना मन दमले होते ना थकले होते शरीर. पवित्र स्थानी नेहमीच प्रसन्न वाटत रहाते व या प्रसन्नावस्थेत कधी , केव्हा शीण जाणवतो काय ? 


वर्ष १९७६-७७. श्री. सोमनाथ समेळ, तुकाराम जाधव आदी शिवप्रेमींनी राज्याभिषेकाला ३०० वर्षे झाल्या निमीत्ते महाराष्ट्राला एक नवी जाणिव करुन दिली की आपल्या श्रद्धास्थानाला आपण प्रदक्षिणा घालु शकतो याची. आणि वरती प्रदक्षिणा देखील लागलीच आयोजीय केली.

 राज्यातुन त्याला प्रचंड प्रमाणात साथ मिळाली, शिवप्रेमींचे पावले या पंढंरी कडे आपसुक वळली, हे काहीतरी नविन घडत होते, या उपक्रमास फार भरभरुन साद , प्रतिसाद मिळाला. मग दरवर्षी ही वारी सुरु झाली.

वर्ष १९७८. भारवलेले कोवळे राजाभाऊ निघाले आपल्या तिर्थक्षेत्री, रायगडाच्या प्रदक्षिणेला. सोमनाथ समेळांनी, तुकाराम जाधवांनी आयोजीलेल्या. 

पहेला नशा, पहेला खुमार, पहिली सह्याद्रीची अंतरंगातुन जवळुन ओळख., पहिले गिरीभ्रमण, पहिलावहिला ट्रेक. इतकी वर्षे लोटली अजुनही मनात आठवणी ताज्यातवान्या, टवटवीत आहेत, त्या प्रदक्षिणेच्या, किलेश्वर रायगडाच्या. ती त्रिपुरी पोर्णीमेची रात्र. रातच्याला टिपुर चांदण्यांनी, पुर्ण चंद्राप्रकाशाने न्ह्याहुन निघालेला ,चन्द्रकिरणांनी उजळुन निघालेला रायगड. सकाळी केलेले प्रदक्षिणा, आणि मग चांदण्या रात्री सर केलेला मातब्बगार किल्ले राजगड. सकाळचे कष्ट, रात्रीचा किल्ला चढणे, पण खुमखुमी काही गेलेली नव्हती, मन सांगत होते, मागत होते, आणखीन, आणखी हवे, मन काही त्रुप्त होता होत नव्हते, पाठपिशवी टाकली आणि मग चारपाच मुसाफीर निघाली रात्रीचे रायगडाचे रुप न्हयाळायला. मग केव्हातेरी पहाटे दमलेले, भागलेले, वारकरी जावुन महाराजांच्या समाधीपाशी निवांत बसले, गप्पा काही  संपत नव्हत्या, मग मधेच एखादी डुलकी. छोटीसीच डुलकी, परत लवकर ऊठुन रायगड पहायचा होताना. झोपुन कसे चालेल ?


येथेच त्यांची ओळख झाली आणि मग दोन छान मैत्रीणी मिळाल्या. मग त्या ज्या गिर्यारोहण संस्थेंच्या सभासद होत्या त्या संस्थेमधुन भ्रमंतीस जाणे सुरु झाले.  


1 comment:

रोहन चौधरी ... said...

पंत... तेंव्हा तर अजून खडतर असेल नाही... :) फोटो आहेत का???