Monday, February 28, 2011

गुळी, गुळोबा उर्फ सुभाष

गुळीचे खरे नाव सुभाष आहे हे आता कोणाच्या लक्षातही नसेल.

"सावलीचं घड्याळ " हे अशोक कोतवालांचे पुस्तक वाचले, म्हटले आपल्या आजुबाजुला अशी कित्येक कष्टकरी माणसे असतात, ज्यांच्यामुळे आपल्या खांद्यावरचा भार कितीतरी पटीने कमी होत असते अश्यां बद्द्ल आपण आज कृतज्ञा व्यक्त करुया.गुळोबा. 

 आयुष्यभर त्याला बघत आलोयं. जसा आहे तसा, काहीही फरक नाही. फरक एकच पडला, आधी गाड्या दुरुस्त करणाऱ्यांचा मदतनीस होता, पण ते कामंच बंद झाले, मग गाड्या धुणे. 

काय बिशाद आहे त्या धुळीची, डागाची एकदा सुभाषचा हात गाडीवरुन फिरल्यानंतर गाडीवर रहाण्याची. 

अगदी साधाभोळा. "वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही, मी करणार नाही ", किंवा खालुन" पैसे टाक, पैसे टाक" या ओरडण्याकडॆ जरा कानाडोळा करुन त्याच्याची बोलावे लागते.

 मग काय. गाडी हसु लागते.

या कामात असे किती पैसे मिळत असावेत ? पण केव्हाही बघावे गुळी गरीबीतही सदैव हसतमुख असतो.

गुळीच्या  हातुन गाडी धुतली जावी निदान यासाठी तरी नविन गाडी घ्यायला हरकत नाही. 

No comments: