मोरुची बायको भल्या सकाळी मोरुस म्हणाली, मोरु उठ, आज रविवार, तु दिलेले प्रॉमीस याद आहे ना, मग अस्मादीक उठले, राम आश्रय, माटुंगा मधे आपल्या बायकोला घेवुन ’कोकोनट शेवई’ खायला घेवुन गेले. (फक्त रविवारी मिळतात) माझा एक पारशी मित्र नेहमी म्हणत असतो की "सबंध जगात जेवढ्या पारशी व्यक्ति असतील त्या पेक्षा जास्त मद्रासी माणसे माटुंग्यात असतील. मग ह्या सर्वांच्या जिव्हा तृप्त करण्यासाठी ह्या भागात अनेक मद्रासी उपहारगृह आहेत, माटुंगा रेल्वे स्टेशन समोरचे, कोपऱ्यावरचे राम आश्रय हे त्यातले एक.
अनेक रविवार सकाळचा आमचा हा अड्डा असतो. राम आश्रय मधे गरमागरम ईडली, वडे, उपमा, नीर डोसा, शिरा, पोंगल अवियल, कोकोनट शेवई, सादा डोसा, रवा डोसा, कांदा उत्त्तप्पा, आदी हादडावे, वर मस्त पैकी गरमागरम कॉफी रिचावी, बस्स, तबीयत खुश होवुन जाते. आम्ही ग्रॅटरोड वरुन, माझी बहीण भांडुपवरुन व आत्याबाई जुहुवरुन केवळ ह्या ख्याण्यावरील प्रेमापोटी येथे एकत्रित येतो.
या विभागातले आमचे दुसरे आकर्षण म्हणजे तेलंग रोडच्या कोपऱ्यावर असणारी हार, फुलांची दुकाने, येधे लटकवलेले मनोवेधक, खुशबुदार, रंगीबेरंगी हार पाहिले की आम्हाला "निदान हे हार गळ्यात घालण्यासाठी तरी, परत लग्न करावेसे वाटते (अर्थात एकामेकाशीच , असत नशिब एकेकाचे )"
आता पर्यंत परप्रांतीय आपल्यावर, मराठी माणसांवर अतिक्रमण करत असत, आता त्यांनी एकामेकावर करण्यास सुरवात केली आहे, या मद्रासी उपहारगृहांचे मुख्य आश्रयदाते गुजराती माणसे झाली आहेत, खरच, खाण्याचे शौक करावेत तर त्यांनीच, भल्यासकाळी, नुसतेच केवळ आपल्या कुटुंबीयांनाच घेवुन नव्हे तर मित्रमंडळीसमवेत ते खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करतात.
या गर्दीचा एक तोटा म्हणजे मग हळूहळू मुळच्या चवी जराश्या बदलत जातात, पुर्वीचा दर्जाही रहात नाही, आरडाओरडाही बराच असतो, त्यांची गंमत चाललेली असते पण इतरांच्या कानांचे पडदे फाटायची वेळ येते. अफाट गर्दी टाळुन येथे जाणे खरे. आज मी ओनियन रवा डोसा मागवला तो अर्धाकच्चाच दिला गेला, कारण हा करणे वेळखावुपणाचे आहे, गर्दीचा टाईमाला हा करणे कठीणच, कोकोनट शेवाईंचा दर्जा ही घसरलेला वाटला. सादा डोसा मागवला तो ही तयार होण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला नव्हता.
कधीतरी मला आता आमचा अड्डा बदलायला हवा, शंकर मठाशेजारील "मणीज " मधे दोनतीन वेळा आम्ही गेलेलो आहोत, परत आता तेथे जावुन पहायला हवे, किंवा मग शारदात जावुन कसे काय आहे याचा स्टॉक घेयला हवा.

6 comments:
nachani bhakri cha beth chan asel
let me what was the whole menu and click some photos too so that we can share the food with you too.
Tell by best wishes to aunty who will be cooking the meal.
Also ask her what goes best other than pithale with a bhakari
harekrishnaji, varnanvachun tondala pani sutala.....pan mani's is best ever....fakta basun gappa marayla jaga soyichi nahi....pan food is great......mazi farmaish mhanun idli vada chatani....khaun bagha.....college chya divasatli khas dish hoti mazi..
Kohom,
Thax for the recomandation
, my next visit to Matunga shall be only for that.
I have enjoyed food in almost all the restauants in Matunga except Sharda and DP. Mani is my favouite too. They have opened a branch next to Shankar Math on Telang Road few months back which is also equally good and where you can sit and chat.
DPs kay vait ahey? I found it nice...but crowded
Matungaaa....food lover's paradise, esp jya lokanna "authentic" jevan avadta tya lokansathi.
I like Idli House at King's Circle, Udipi Shri Krishna Lodging just outside Matunga (Central) Station and I once had authentic "Madrasi" thali at Mahabhoj, which was also nice. Just a stone's throw away from USK
RamAshray nakki kuthe ahey? Is it in front of one "Mangalore Jewellers" on the corner towards Matunga station
wow kaay mast photos aahet.
nakaa ho chiDau aamhaalaa ikaDe he padaartha pahaayalaasudhaa miLat naaheet :(
varsha,
diago, opp, Matunga rly stn, opp Mahalakshmi Saree Centre , on the corner, you cannot miss it. sundays to be avoided
Post a Comment