Wednesday, May 02, 2007

दुर्वांकुर डायनींग हॉल, टिळक रोड, पुणे


वट्ट जेवले तट्ट फुगले घरी जावुनी स्वस्थ निजले । बायको म्हणे काय झाले अग *** माज्जे पोट्ट फुगले ॥ दुर्वांकुर डायनींग हॉल, टिळक रोड, पुणे, मधे भरपेट जेवल्यावर दुसरे काय होणार ? ह्या दिवसात रविवारी तर चंगळच असते. अमर्यादीत आमरस व जिलेबीचे सुग्रास जेवण आणखीन काय हवे जातीच्या खव्वयांना हाणायला ? सोबतीला थालीपिठ आहे, कोथिबिंर वडी आहे, दहीवडा आहे, चार प्रकारच्या भाज्या आहेत, दोन प्रकारच्या भाकऱ्या आहेत, डाळ, ताकाची कढी आहे. काकडीची कोशिंबीर आहे, विविध चटण्या, लोणची आहेत, ताक तर आहेच वर मुगाच्या डाळीची खिचडी आहे आणि ह्या तृप्तीत भर टाकायला आखिरीस वरणभात वरती साजुक तुप आहे. हे सर्व रु,१००.०० मध्ये. इतर दिवशी रु. ७०.०० पण त्यात गोड पदार्थ वेगळे घेयला लागतात.
दुर्वांकुर मधल्या आतिथ्याबद्द्ल काय म्हणावे, अहो थाळीतील एखादा पदार्थ संपण्याची खोटी, ताबडतोब तो थाळीत भरला जातो, वर परत त्यांची माणसे सतत येवुन काय हवय का सतत विचारत असतात, फर्माईश करण्याची खोटी, लगेचच पानात पदार्थ हजर.
कोण ते खवचटपणे सांगते की पुण्यात "पुढच्या वेळी याल तर जेवायलाच या" असे म्हणण्याची पद्ध्त आहे ?

3 comments:

अनु said...

तुमच्या ब्लॉगवरील खाद्यजागांची छायाचित्रे पाहून छान वाटते.
पुण्यातील खाद्यस्थळांविषयी आणखी लिहा.नुसते पारंपारीकच नव्हे, तर पंजाबी,चायानीज,इतर अन्न चांगले कुठे मिलते त्या जागा व छायाचित्रे पाहण्याची इच्छा आहे.

Yogesh said...

सही. :)

HAREKRISHNAJI said...

अनु,

जरुर लिहिन.

योगेश,

सही रे सही