Friday, May 04, 2007

द ब्रेडविनर " व "परवानाज जर्नी"

मानवाला मानव म्हणुन जगुन न देणाऱ्यांना यातुन काय मिळते? सत्ता , संपत्ती की आणखी काही ? काही पुस्तके मन खुप अस्वस्थ, सुन्न, बैचैन करुन सोडतात, दिवाणखाण्यात, भरल्या पोटी वाचताना जर आपली ही स्थिती, तर हे हाल, कष्ट, सहन करणाऱ्यांचे काय होत असावे? तालिबानी राजवाटीत अपार छळ,यातना सहता सहता गलितगात्र झालेल्या मोठयामाणसांमधे, आपल्या कमाईतुन केवळ घर चालावे ह्या हेतुने केस कापुन, पुरुषी कपडे घालुन काबुलच्या बाज़ारात. तालिबान्यांची नजर चुकवीत, फेरीवाल्याचे काम करणारी १२-१३ वर्षीय परवाना ही मुलगी "द ब्रेडविनर " मूळ इंग्रजी लेखिका डेबोरा एलीस, अनुवाद अपर्णा वेलणकर या पुस्तकाची नायीका. हे पुस्तक वाचताना, नकळत त्यात समरस होताना, खुप आत कोठेतरी जखम भळभळायला लागते. आपले हे सोंग उघडकीस येण्याने तिला मिळणार असते ते केवळ मरण.
हाच काय तो प्रवास प्रगत मानववंशाचा ?
आज ह्या तीन पुस्तकांच्या मालिकेतील दुसरे पुस्तक "परवानाज जर्नी" चा अनुवाद वाचायला घेतला. इंग्लंडला जावुन उच्चशिक्षण घेतल्याची शिक्षा म्हणुन तुरुंगात भोगलेल्या त्यात झालेली मारहाण सहन करीत पिचलेल्या परवानाच्या अब्बुचे अल्लाला प्यारे होणे, व त्यांच्या शिवाय आपल्या अम्मीला, दोन बहीणींना, लहान भावाला शोधायला निघालेल्या या तेरा वर्षीय परवानानी हे आयुष्य किती सहन केलय ! का तर तिला फक्त या क्रुर जगात जिवंत रहायचय म्हणुन. ह्या प्रवासात ती आपल्याबरोबर हसन या तान्या मुलाचे, पांगळ्या लहान आसीफचे, मानसीक स्वास्थ हरपलेल्या लहान लैलाचेही ओझे वाहत रहाते, जिथे स्वःताच्या जगण्याचा भरवसा नाही तेथे परकीयांसाठी ती अपार कष्ट करते, शिळेपाळे, बुरशी आलेले अन्न, कागद, गवत काय वाट्टेल ते खावुन, घाणेरडयातील घाणेरडे पाणी पिवुन, प्रसंगी उपासमार सहन करीत, अत्यंत प्रतीकुल परिस्थितीत, जिवावर उदार होत, जवळपास होणारा बॉम्बवर्षावातुन जीव वाचवीत, मधेच प्रेतासमवेत रहात, पायी अगणित मैल नी मैल वाटचाल करीत, अखेरीस हा तांडा पोहचतो तो निर्वासीतांच्या छावणीत. येथेही आयुष्य अमानावीच असते, पण त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे परवानाला येथे आ़खिरीस भेटतात ते तिची अम्मी, मोठी बहीण नूरीया, धाकटी बहीण मरीयम आणि छोटा भाऊ अली. दुर्देवाची गोष्ट म्हणजे पेरलेल्या सुरुंगातुन आकाशातुन विमानांनी टाकलेल्या वस्तु गोळा करण्यासाठी धडपडणाऱ्या लैलाला, तिला गमवायला लागते, कधीकधी वाईटातुन चांगले निघते, लेलाच्या मॄतदेहाशेजारी बसलेल्या बाईचा आवाज ओळखीचा वाटला म्हणुन तिचा बुरखा उचलला तर परवनाला मिळते ती तिची अम्मी. काही दिवसानी तिचा छोटा भाऊ पण जातो,डॉक्टर, ओषधपाण्या अभावी.

आज परवाना जगते आहे ती सर्वांना घेवुन एके दिवशी फ़्रान्सला जाण्याचे स्वप्न ऊराशी बाळगत.

या मालीकेतील तिसरे पुस्तक "मड सिटी "

2 comments:

A woman from India said...

पुस्तकांची माहिती टाकल्याबद्दल धन्यवाद.

HAREKRISHNAJI said...

हि पुस्तके जरुर वाचा.