Monday, October 25, 2010

पुणे ते मुंबई - प्रवास करायला लागला वेळ फक्‍त १४ तास ४५ मिनिटे.हाती गाडी असावी, साथीला श्री. सुरेश परांजपे यांची सोबत असावी,  साऱ्या मावळप्रांतात भटकंती करण्याची तीव्र इच्छा असावी.

द्रुतगती महामार्ग , प्रवास नुसता एक सुरी. कंटाळा आणणारा.
मुंबईवरुन पुण्याला जायला तसे अनेक मार्ग आहेत, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ हे तर रोजचेच झाले.
 सारे आयुष्य याच मार्गी प्रवास करायचे ?

पाली, रवाळजे, भिरा, ताम्हीणी, मुळशी अश्या मार्गे प्रवास करतांना मधे उजवी कडॆ फुटणारे रस्ते खुणवत होते. घुसळखांबला बाहेर पडणारा, भांबुर्ड्याला बाहेर पडणारा, पवनाकाठाने जात जात  लोहगडच्या कुशीतुन लोणावळ्याला बाहेर पडणारा, असे एक ना अनेक रस्ते.

कधीतरी या रस्तातुन सह्याद्रीचे रुप न्हाहाळत जायचे होते.
 भीरा पॉवर हाऊस डोंगरमाथ्यावरुन पहायचे होते, वरुन मुळशी तलावाचे सौंदर्यांची मजा लुटायची होती.

प्लस व्हॅली, ( काय जबरदस्त लोकेशन आहे ) नीवे-वांद्रे रस्ता, पिंपरी ,माले गाव येथील धरण, परांते वाडी,  मुळशी , ताम्हीणी ,काळुबाईची देवराई. रवाळजे येथील धरण, पालीचा बलाळॆश्वर, पालीजवळ पेशवेकालीन मंदिरात असणारा सिद्धेश्वर , आणि मुख्य म्हणजे बरेच वर्षे न खाल्लेला वडखळ नाक्यावरचा बटाटावडा.

ना डोळे थकले ना सतत गाडी चालवुन शरीर व मन.

1 comment:

Aakash said...

वाः!
अगदी सुट्ट-सुट्टीत, आणि मनमोहक फोटो!