Saturday, October 30, 2010

जावु तेथे खावु

जे ना लाभे सौख्य महाली ते लाभे ..



यापुर्वी पणजी मधे हे उपहारगृह कसे काय सापडले नव्हते याचे राहुन राहुन आश्चर्य वाटुन राहिलयं.

राजाभाऊ चहापान , हो फक्‍त चहापान ( आणि ते पण पणजीमधे ,  अहो काय म्हणता काय ? ) करण्यासाठी कॅफे रियल मधे शिरले. आत शिरले तेव्हा त्यांना कुठे ठावुन होते की एक समाधान देणारी, तृप्त करणारी, आणि साधी, सरळ बटाटा भाजी आपली वाट बघत आहे. 

आजुबाजुच्या टॆबलांवरती बहुतेक सर्वच ही भाजी व सोबत गोव्याचे खास पाव खातांना पाहुन राजाभाऊंच्याने राहवेना, धीर धरवेना.

चव केवळ अप्रतिम, उपहारगृह अत्यंत स्वच्छ, वाढवी चांगल्या  प्रसन्नावस्थेतले.

काश पोटात आणखी जराशी जागा असती, मिरचीची भजी (बहुदा ) पण रिचवली गेली असती.

No comments: