प्रिय डायरी,
आज खुप खुप वर्षापासुन असलेली इच्छा पुर्ण झाली.
मनात वीणा सहस्त्रबुद्धे यांचे गाणे ऐकण्याची आयुष्यभर उराशी बाळगलेली फार तीव्र इच्छा होती.
सकाळी , रात्री गाडी चालवता चालवता वीणाताईंची मनमुराद गाणी ऐकली.
वा राजाभाऊ,
नई गाडी, नया घर , बढीया है !
और वही पुरानी ........
1 comment:
मुंबईच्या
खड्डे सुशोभित रस्त्यांवरून
विहारताना अनेकदा
त्यांना स्वप्न पडे
त्यांना उचकी लागे
कुणा एका हवेतून उडणार्या गाडीची आठवण ......
हळूच आळस देउन सुरु होणारी
श्रीखंडात डाव फिराव्ल्यासारखे गियर्स टाकणारी
आणि
शिजलेल्या पुरणात डाव उभा राहतो तशी ब्रेक लावणारी
उलटी जातांना "सारे जहांसे अच्छा " आळवणारी ,
सुलटी जातांना सीडी वर गझल ऐकवणारी ......
आणि ते मारुतीरायाला शरण गेले .....
मग साक्षात भीमरुपी गदा उचलून म्हणाले,
"भक्ता, आम्ही तुझ्यावर खुश आहोत ,
ह्या वाढदिवशी तुला
सही ला पेन मिळेल
चालवायला लेन मिळेल
एस्तीलो ची झेन मिळेल...
तथास्तु !"
Post a Comment