Thursday, September 30, 2010

तुमचे पण बरोबर आणि तुमचेही बरोबर.

तात्या रविवारी सकाळी मटण आणायला बाजारात गेले.

आपले दोन्ही पंजे त्या खाटीकापुढे नाचवत नाचवत विचारु लागले " मटण कैसा किलो ? कैसा किलो ? बोलो , कैसा किलो. "

तात्यांच्या हाताच्या दहाही बोटामधे सोन्याच्या अंगठ्या होत्या. 

या त्यांच्या वर्तनाने रागवलेल्या खाटीकाने आपले तोंड फिस्करुन तात्यांना सांगितले " दोसो रुपया, दोसो रुपया, दोसो रुपया किलो "

त्या खाटीकाचे सर्व दात सोन्याचे होते.

झाले तात्या व खाटिकाची लग्गालगी सुरु झाले. भांडण काही मिटता मिटे ना, शेवटी दोघेही न्यायालयात गेले, आपली कैफियत जज्जसाहिबांसमोर मांडली.

जज्जासाहिबांनी मान वळवुन तात्यांकडॆ बघितले, " तुम्हारा भी बराबर " आणि परत मान खाटीकाकडॆ वळवुन त्याला सांगितले " तुम्हाराभी बात बरोबर " एक्दा तात्याकडॆ , परत खाटीकाकडॆ वळत, परत परत त्यांना सांगु लागले. "तुमचे पण बरोबर आणि तुमचेही बरोबर. "

जज्जासाहिबांच्या कानात चांगल्याच वजनदार हिऱ्याच्या कुड्या.

सांगायचे तात्पर्य म्हणजे ......

2 comments:

मुक्त कलंदर said...

सांगायचे तात्पर्य म्हणजे जो तो आपलीच मिरवतो... आणि पोस्ट एकदम भारी...

HAREKRISHNAJI said...

मुक्त कलंदर,

एका निकालाने तिघेही खुष.