ती एक नाजुक राजकन्या.
फार नाजुक. अती नाजुक. अनेक , अनेक नरम, अतीनरम , सावरीच्या कापसाचे बिछाने घातलेल्या पलंगावर ती झोपत असे.
एक रात्र तिला झोपच लागली नाही, सारी रात्र तळमळत काढली.
अगदी खालच्या बिछान्यावर मुद्दाम ठेवलेला एक छोटुसा वटाणा तिला टोचत राहिला.
चिंता, चिंता आणि चिंता, मानसिक ताण आणि तणाव, नैराश्य यांनी ते रात्रभर कुस बदलत राहिले, झोप म्हणुन यायच नाव नाही.
आणि
हे
केवळ डोक्यावर छप्पर नाही म्हणुन .
गॉडफादर मधे एक वाक्य आहे, गॉडफादर म्हणतात, "तुम्हाला वाटते त्याप्रमाणे खरच माझ्या जवळ ताकद असती तर मी परमेश्वरापेक्षा दयाळु झालो असतो.
No comments:
Post a Comment